Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > खोकल्याने हैराण आहात? ५ घरगुती उपाय करून पाहा, सततचा खोकला होईल कमी

खोकल्याने हैराण आहात? ५ घरगुती उपाय करून पाहा, सततचा खोकला होईल कमी

5 Best Natural Cough Remedies and Prevention Tips : घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून काढतील ५ घरगुती उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 06:34 PM2023-10-19T18:34:20+5:302023-10-19T18:35:00+5:30

5 Best Natural Cough Remedies and Prevention Tips : घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून काढतील ५ घरगुती उपाय..

5 Best Natural Cough Remedies and Prevention Tips | खोकल्याने हैराण आहात? ५ घरगुती उपाय करून पाहा, सततचा खोकला होईल कमी

खोकल्याने हैराण आहात? ५ घरगुती उपाय करून पाहा, सततचा खोकला होईल कमी

आता काही दिवसात हिवाळा सुरु होईल. वातावरणात देखील गारवा जाणवत आहे. गुलाबी थंडी वाढल्यानंतर अनेक आजारही मागे लागतात. या दिवसात सर्दी, खोकला, ताप येणे सामान्य. मुख्य खोकल्यामुळे लोक हैराण होतात. खोकला हा दोन प्रकारचा असतो. एक कोरडा खोकला तर, दुसरा ओला खोकला.

खोकल्यावर उपाय म्हणून आपण अनेकदा घरगुती उपाय किंवा औषधे घेतो. ओला खोकला झाल्यावर फुफ्फुस आणि श्वसनमार्गामध्ये कफ साचतो. त्यामुळे खोकला अधिक त्रासदायक होतो. जर आपल्याला कफ आणि खोकल्यापासून सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे नक्कीच आपल्याला मदत मिळेल(5 Best Natural Cough Remedies and Prevention Tips).

पुदिना आणि तुळशीच्या पानांचा चहा

खोकला झाल्यास आपण पुदिना व तुळशीच्या पानांचा चहा तयार करून पिऊ शकता. हा उपाय खोकल्यापासून झटपट आराम तर देतोच, शिवाय यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. ज्यामुळे आपण वारंवार आजारी पडत नाही. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, तुळशीच्या पानांमधील गुणधर्म खोकला आणि श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतात.

मधुमेह झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ५ मुख्य लक्षणे, वेळीच ओळखा, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

मध आणि लवंग

मध आणि लवंगामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. जर आपल्याला कफ आणि खोकल्याचा त्रास असेल तर, मध आणि लवंगाचा उपाय करून पाहा. यासाठी एका वाटीत मध घ्या, त्यात एक किंवा दोन लवंगा बारीक करून मिक्स करा. तयार पेस्ट दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.

आलं आणि मध

मध श्वसनमार्गातील कफ बाहेर काढते. तर आल्यामधील दाहक-विरोधी गुणधर्म संसर्गामुळे होणारी इन्फ्लेमेशन कमी करण्याचे काम करते. यासाठी एका वाटीत मध घ्या, त्यात ठेचून घेतलेलं आलं घालून मिक्स करा. तयार पेस्ट दिवसातून २ वेळा खा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याच्या पायांवर दिसतात ६ खुणा, वेळीच लक्षणं ओळखा-दुर्लक्ष केलं तर जीवाला धोका

नियमित करा २ घरगुती उपाय

जर आपल्याला वारंवार खोकला आणि कफचा त्रास होत असेल तर, कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. आपण रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट दुधात हळद मिक्स करून पिऊ शकता. जोपर्यंत खोकल्यापासून आराम मिळत नाही, हे उपाय करत राहा.

Web Title: 5 Best Natural Cough Remedies and Prevention Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.