शरीराचा फिटनेस मेटेंन ठेवण्यासाठी आणि हाडं हेल्दी ठेवण्यासाठी कॅल्शियम, प्रोटीन्स गरजेचे असतात. हाडांनी विशेष काळजी घेतली नाहीतर आर्थरायटीस, ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांचे इतर गंभीर आजार उद्भवू शकतात. वाढत्या वयात कंबरदुखी, पाठदुखी यांसारखे आजार उद्भवतात. (Foods For Calcium) यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सप्लिमेंट्स घेतल्या जातात. (Calcium content of common foods) हाडांच्या आणि सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यासाठी काही हर्ब्सचा आणि पौष्टीक पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. आयुर्वेदाचार्य डॉ. जितेंद्र शर्मा यांनी एका वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (5 Food Sources Of Calcium For Your Bones)
हाडं मजबूत ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
1) लेमनग्रास
लेमनग्रास तब्येतीसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहे. चहाच्या स्वरूपात तुम्ही लेमनग्रासचे सेवन करू सकता. लेमनग्रासमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यात फ्लेवोनॉइड असते ते हाडांच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी गरजेचे असते. लेमनग्रास चहाचे नियमित सेवन केल्यानं इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत होते. अनेक आजारांचा धोका टळतो.
ऑफिसमध्ये तासनतास बसून पोट सुटलंय? जागेवरच उभं राहून ३ व्यायाम करा, मेंटेन होईल फिगर
2) गुळवेल
गुळवेल आरोग्यासाठी वरदान ठरते. आयुर्वेदात याचा उपयोग अनेक आजारांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. गुळवेल कॉपर, आयर्न, फॉस्फरेस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व असतात. जी हाडांना मजबूत बनवण्यास मदत करतात. चुर्ण किंवा ज्यूसच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता.
3) हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करा
डॉक्टर नेहमीच हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. आहारात केल, पालक, मेथी, सोयाबीन, ब्रोकोली संत्री या पदार्थांचा समावेश करा.
लहान वयातच चष्मा लागला-नजर कमजोर झाली? रोज खा ५ व्हेज पदार्थ, चष्म्याचा नंबर होईल कमी
4) सोयाबीन
सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि आयर्नचे प्रमाण भरपूर असते. सोयाबीनमधील पोषक तत्व हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हाडांना मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सोयाबीनचे सेवन गरजेचे आहे. टोफूचाही तुम्ही आहारात समावेश करू शकता.
5) बदाम
बदाम कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर आहारात बदामाचा समावेश करू सकता. बदाम तुम्ही पाण्यात भिजवून खाऊ शकता किंवा लाडूमध्ये किंवा दूधात बदामाचे घालून सेवन करा.