आपल्यापैकी अनेकांना तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रिनसमोर बसून काम करावे लागते. दिवसभरातील बहुतांश वेळ हा लॅपटॉप, मोबाईल स्क्रिनवर जात असल्याने याचा डोळ्यांवर ताण येतो. लॅपटॉप स्क्रिन आपल्या डोळ्यांप्रमाणे डिझायन केलेल्या नसल्यामुळे त्याच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांचा थकवा, कोरडेपणा आणि डोकेदुखीची समस्या सारखी जाणवते. सध्याच्या परिस्थितीत, कामाचा भाग म्हणून आपल्याला दिवसातून काही तास लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि ते झालं की मोबाईल अशा प्रकारचे गॅझेट्स वापरण्यावरच जातो.
सतत स्क्रिनचा वापर केल्यामुळे डोळ्यांचे व्हायचे ते नुकसान (side effects of screen on eyes) होतेच. डोळे जळजळणे, डोळ्यांत काहीतरी खुपल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून पाणी येणे, असा वेगवेगळा त्रास त्यातून होतो. सतत स्क्रिनसमोर असल्याने (screen time) डोळ्यांचा नंबरही सारखा वाढत जातो. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी (How to reduce Eye fatigue due to screen?) काही उपाय केले किंवा स्क्रिन बघताना काही नियम पाळले, तरी नक्कीच फायदा होऊ शकतो(5 Common Mistakes While Using Laptops You Need To Avoid Today).
दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर समोर बसून डोळे व शरीरावर खूप ताण येतो, अशावेळी या ४ चुका करु नका...
चूक १ : लॅपटॉपचा वापर करताना पोटावर पालथे झोपून दोन्ही हातांना ताण देऊन तो वापरणे.
आपल्यापैकी बरेचजण कॉम्पुटर, लॅपटॉप. मोबाईल यांसारख्या गॅझेट्सचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने बसतात ही आपली सर्वात मोठी चूक आहे. चुकीच्या पोश्चरमध्ये बसल्याने आपल्याला वारंवार पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच आपण काहीवेळा लॅपटॉप गादीवर किंवा बेडवर ठेवून पोटावर पालथे होऊन लॅपटॉपवर काम करतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे पोटावर ताण येऊन पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात.
डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा...
चूक २ : लॅपटॉप किंवा कॉम्पुटरची स्क्रिन ही आपल्या आय लेव्हला मॅच न करता लॅपटॉप कुठेही ठेवणे.
शक्यतो लॅपटॉप हा आपण कुठेही सहजरित्या नेऊ, आणू शकतो. लॅपटॉप घेऊन आपण कुठेही, कधीही सोयीस्कररीत्या बसू शकतो. हा त्याचा एक फायदा असला तरीही हाच त्याचा एक मोठा तोटा देखील ठरु शकतो. आपण लॅपटॉप घेऊन कुठेही बसू शकत असलो तरीही त्याची स्क्रिन लेव्हल आपल्या डोळ्यांच्या लेव्हल मॅच होणारी असावी. काहीवेळा आपण लॅपटॉप आपल्या मांडीवर घेऊन बसतो अशावेळी लॅपटॉपची स्क्रिन आपल्या आय लेव्हल मॅच होत नाही. अशावेळी डोळ्यांवर खूप ताण येतो त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठीच लॅपटॉपची स्क्रिन ही नेहमी आपल्या डोळ्यांना मॅच होणारी असावी. लॅपटॉपची स्क्रिन ही नेहमी आपल्या डोळ्यांच्या बरोबर समोर असावी यामुळे डोळयांवर ताण येत नाही.
चूक ३ : लॅपटॉप सरळ मांडीवर घेऊन बसणे.
काहीवेळा घाईत असताना आपण लॅपटॉप टेबलावर न ठेवता तो सरळ मांडीवर किंवा हातात घेऊन काम सुरु करतो, परंतु हे अतिशय चुकीचे आहे. लॅपटॉपचा बराचवेळ वापर केल्याने त्याचा पृष्ठभाग काही काळाने गरम होतो. असा गरम झालेला लॅपटॉप आपण मांडीवर ठेवल्यास याच्या उष्णतेमुळे पायांच्या नसांना इजा पोहोचू शकते. पायांच्या नसांना इजा होऊन या उष्णतेमुळे त्यांच्यात काही बिघाड होऊ शकतो. यामुळे लॅपटॉप शक्यतो मांडीवर ठेवणे टाळावे, तो व्यवस्थित टेबलावर ठेवून वापरावा. जर आपल्याजवळ टेबल नसेल तर एखादी उशी घेऊन ती मांडीवर ठेवावी व त्या उशीवर लॅपटॉप ठेवावा.
मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...
चूक ४ : लॅपटॉपवर काम करताना अधून - मधून डोळ्यांची उघडझाप न करता सतत स्क्रिनकडे पहात राहणे.
डोळे मिचकावल्याने डोळ्यांचा एक छोटासा व्यायाम केल्यासारखे होते आणि यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. डिजिटल स्क्रीन वापरताना आपण कमी वेळा डोळे मिचकावतो, ज्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी डोळे सतत मिचकावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.