Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

5 diet changes that help boost energy levels naturally : वजन घटवण्यासाठी व्यायामापूर्वी ५ पैकी १ पदार्थ रोज खा - मिळेल ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2024 12:44 PM2024-07-14T12:44:40+5:302024-07-14T12:45:44+5:30

5 diet changes that help boost energy levels naturally : वजन घटवण्यासाठी व्यायामापूर्वी ५ पैकी १ पदार्थ रोज खा - मिळेल ताकद

5 diet changes that help boost energy levels naturally | व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

आजकाल अनेकांना आपल्या फिटनेसचं महत्व पटलं आहे (Diet Plan). लोक व्यायामाबरोबर डाएट देखील फॉलो करीत आहेत. कारण व्यायाम कुठलाही असो, त्याला योग्य आहाराची जोड मिळाली तर, व्यायामाचा सकरात्मक परिणाम आपल्या हेल्थवर दिसून येतो (Boost Energy). बऱ्याचदा व्यायाम करताना आपल्याला थकवा जाणवतो. ज्यामुळे आपल्याकडून योग्यरित्या वर्कआउट होत नाही (Weight Loss Foods).

अशावेळी व्यायामापूर्वीचा आहार अतिशय महत्वाचा असतो. ज्यामुळे शरीरात उर्जेची कमतरता जाणवत नाही. व्यायामापूर्वी कोणतं प्री - वर्कआउट पदार्थ खावे, याची माहिती आपल्याला ठाऊक हवी. कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीरात उर्जा वाढते, पाहूयात(5 diet changes that help boost energy levels naturally).

केळी

वजन वाढण्याच्या भीतीने लोक केळी खात नाहीत. पण व्यायामापूर्वी केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळीमध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतरही काही आवश्यक पोषक तत्व असतात. शिवाय यात फायबरचेही प्रमाण जास्त असते. जर आपल्याला प्री वर्कआउटला हेल्दी खायचं असेल तर, केळी हे उत्तम फळ आहे.

पावसाळ्यात ४ पदार्थ न चुकता खा, सुधारेल पचन आणि मेटाबॉलिजम वाढल्याने वजनही घटेल पटकन

ओट्स

व्यायामापूर्वी ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. ओट्समध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीराला उर्जा प्रदान करतात. ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ उर्जा मिळते. शिवाय यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. व्यायामापूर्वी आपण ओट्समध्ये दूध घालून खाऊ शकता.

दही

दही हे प्रोटीनचे उत्तम सोर्स आहे. व्यायामापूर्वी दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये असलेले कार्ब्स त्वरित ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. वर्कआउट करण्यापूर्वी आपण दही खाऊ शकता.

सफरचंद

व्यायामापूर्वी आपण सफरचंद खाऊ शकता. यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होते.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

पीनट बटर

व्यायामापूर्वी आपण पीनट बटर खाऊ शकता. यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आहे. जे आपल्याला हाय इन्टेन्सिटी वर्कआऊटसाठी मदत करतात. 

Web Title: 5 diet changes that help boost energy levels naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.