Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ‘व्हिटामिन डी’ साठी औषधं घेताय? त्यासोबतच खा ५ पदार्थ, हाडं होतील मजबूत-डेफिशियन्सी असेल तर..

‘व्हिटामिन डी’ साठी औषधं घेताय? त्यासोबतच खा ५ पदार्थ, हाडं होतील मजबूत-डेफिशियन्सी असेल तर..

5 Essential Sources of Vitamin D for Vegetarians : व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 05:55 PM2024-05-28T17:55:35+5:302024-05-28T17:57:35+5:30

5 Essential Sources of Vitamin D for Vegetarians : व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

5 Essential Sources of Vitamin D for Vegetarians | ‘व्हिटामिन डी’ साठी औषधं घेताय? त्यासोबतच खा ५ पदार्थ, हाडं होतील मजबूत-डेफिशियन्सी असेल तर..

‘व्हिटामिन डी’ साठी औषधं घेताय? त्यासोबतच खा ५ पदार्थ, हाडं होतील मजबूत-डेफिशियन्सी असेल तर..

आपल्या शरीराला विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज असते (Vitamin D). त्यात व्हिटॅमिन डीचा देखील समावेश आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यास आणि वापरण्यास मदत करते, जे हाडांना मजबुती देते (Health Tips). जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते, तेव्हा व्हिटॅमिन डी शरीराद्वारे तयार केले जाते.

परंतु, काही वेळेला उन्हात जाऊन व्हिटॅमिन डी घेणं शक्य होत नाही. त्यामुळे आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यानेही आपल्याला व्हिटॅमिन डी मिळू शकते. शरीराला व्हिटॅमिन डी मिळावे म्हणून काय खावे? याचं उत्तर आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी दिलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या काही व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला पुरेपूर फायदा मिळेल(5 Essential Sources of Vitamin D for Vegetarians).

व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थ

दूध

दूध हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही असते. गाईच्या दुधात व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळते. दररोज १ ग्लास गाईचे दूध प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळू शकते. याशिवाय आपण दुग्धजन्य पदार्थ देखील खाऊ शकता.

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे ५ पदार्थ, हृदय ठेवा ठणठणीत-रक्ताभिसरणही सुधारेल

मशरूम

काही लोक मशरूम खाताना नाक मुरडतात. पण मशरूम खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात  व्हिटॅमिन बी१, बी२, बी५, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. मशरूम व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत मानला जातो. आपण मशरूम भाज्यांमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात मिक्स करून खाऊ शकता.

दही

उन्हाळ्यात रोज दही खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते. शिवाय त्यात कॅल्शियमही असते. दह्यामुळे हाडे मजबूत होतात. दही खाल्ल्याने पोटही तंदुरुस्त राहते.

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स आले, तुमचं पोट तर बिघडलेलं नाही? पाहा पिंपल्स येण्याची ३ कारणं..

संत्री

लोक संत्र्याला व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानतात, पण संत्री खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळते. आपण संत्र्याचा ज्यूस किंवा नुसतं संत्री खाऊ शकता.

गहू, बार्ली आणि इतर धान्य

आपण आपल्या आहारात गहू, बार्ली आणि इतर धान्यांचा समावेश करू शकता. यामध्ये विविध पौष्टीक घटकांसह व्हिटॅमिन डी देखील आढळते. ओट्समध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे धान्यांचा आहारात नक्कीच समावेश करा.

Web Title: 5 Essential Sources of Vitamin D for Vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.