डोळे फार नाजूक असतात. त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. डोळ्यांच्या दुखण्याकडे लक्ष न दिल्यास दृष्टी कमी होते. ज्यात डोळे लाल होणे ही एक सर्वसाधारण समस्या आहे. ही समस्या अनेकदा ऍलर्जीमुळेही होऊ शकते. मात्र, डोळ्यांचा पांढरा भाग वारंवार लाल होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. बहुतांश वेळा कळत नकळत आपल्याकडून अनेक चुका घडतात, ज्यामुळे डोळ्यांच्या नसांना इजा पोहचते. अशा स्थितीत डोळे लाल होतात. या स्थितीला ब्लडशॉट आय किंवा रेड आय असेही म्हणतात.
यासंदर्भात, साई आय केअर अँड मेडिकल सेंटर, गाझियाबादचे फाको आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. ललित सिंघल म्हणतात, ''डोळ्यांना खाज किंवा लाली आल्यास चोळू नका. थेट नळाखाली डोळा धरु नका. ५ गोष्टी टाळाच, डोळे सांभाळा!(5 Eye Problems You Shouldn't Ignore).
१५ दिवस भाज्या आणि फळं खाल्लीच नाहीत तर? डॉक्टर सांगतात, नखरे करण्याचे ३ दुष्परिणाम
स्क्रीन टायमिंग कमी करा
लोकांमध्ये सध्या स्क्रीन टायमिंग वाढत चाललं आहे. अनेकांना मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, ऑनलाइन गेम्सचं व्यसन लागलं आहे. आपलं लक्ष स्क्रीनकडे असताना आपण जास्त डोळे मिचकवत नाही. ज्यामुळे अश्रूंची गुणवत्ता कमी होते, व डोळे कोरडे होतात. या समस्येला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (CVS) म्हणतात.
अयोग्य कॉन्टॅक्ट लेन्स घालणे
आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, योग्य लेन्स घाला. चुकीच्या दीर्घकाळ वापरल्याने अल्सर किंवा इन्फेक्शन होऊ शकते.
झोपेत आपण धाडकन पडल्यासारखे वाटते? हा भास की आजार? नक्की कारण काय..
डोळे लाल होण्याचे कारण
जर आपण उच्च रक्तदाब, किंवा रक्त पातळ करणाऱ्या पदार्थांचे सेवन इत्यादींकडे लक्ष देत नसाल, तर या चुकीमुळे ब्लड शॉट आय होण्याची शक्यता वाढते.
डोळे कव्हर करा
उन्हात घराबाहेर पडल्यावर डोळ्यांना गॉगल किंवा इतर चष्म्या लावा. कारण, उन्हाळ्यात धूळ, प्रदूषण आणि अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने, डोळे लाल होण्याची समस्या होऊ शकते.
‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..
प्रतिकारशक्तीकडे लक्ष न देणे
कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे डोळ्यांच्या संसर्गासह इन्फेक्शन होऊ शकते. कोरोनानंतर आय इन्फेक्शन व अल्सरच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा धोका अधिक आहे.