Join us   

डायबिटीस नियंत्रणात ठेवणारे ५ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात- आजार नियंत्रणात ठेवायचा तर.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2022 6:09 PM

Food That Controls Diabetes: डायबिटीस असेल तर खावं आणि काय टाळावं, याबाबत अनेकांच्या मनात नेहमीच संभ्रम असतो. म्हणूनच वाचा आहारतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला.

ठळक मुद्दे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी शेअर केलेला हा खास व्हिडिओ. 

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा आजार सध्या एवढा जास्त वाढला आहे की प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या कुटूंबात मधुमेह असणारी एक तरी व्यक्ती असतेच. शिवाय आता बदललेल्या लाईफस्टाईलमुळेही कमी वयात मधुमेह होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. एकदा मधुमेह मागे लागला की मग खाण्यापिण्याची अनेक पथ्ये पाळावी लागतात. शिवाय त्याविषयीचे अनेक सल्लेही वेगवेगळ्या लोकांकडून नेहमीच मिळतात (how to control diabetes?). अशावेळी काय खावं आणि काय टाळावं, याबाबत मग अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो (5 Food items that controls diabetes). म्हणूनच हा संभ्रम दूर करून डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं (Diabetes patients should avoid 5 food items), याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी शेअर केलेला हा खास व्हिडिओ. 

 

मधुमेह असणाऱ्यांनी कोणते पदार्थ खावेत? १. The Mindful Diet या त्यांच्या यु- ट्यूब चॅनलवर माहिती शेअर करताना मंजिरी म्हणाल्या की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ म्हणजेच ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स ४० पेक्षा कमी आहे, असे पदार्थ खाण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून शरीरातील इन्सुलिन सिक्रिशन नियंत्रणात राहील. 

भाऊ असावा तर असा! बहिणीला घासातला घास देणारा भाऊ, या मायेला काय म्हणावे? पाहा व्हिडिओ

२. त्याच बरोबर सिट्रस प्रकारात मोडणारी फळं म्हणजेच ज्या फळांमध्ये सायट्रिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहेत, अशी फळं खाण्यावर भर दिला पाहिजे. उदा. संत्री, डाळिंब, मोसंबी, आवळा.

३. ओमेगा ३ फॅटी ॲसिड जास्त असणारे पदार्थ खावेत. उदा- जवस, अक्रोड.

४. दालचिनी, जायफळ, लवंग, मिरे या मसाल्यांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आहारात समावेश करावा. कारण त्यामुळे मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया उत्तम राहते.

५. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स फूड म्हणजेच ज्या पदार्थांमध्ये सोल्युबल फायबर जास्त आहेत, असे पदार्थही पुरेशा प्रमाणात खायला पाहिजेत. 

 

मधुमेहींनी कोणते पदार्थ खाणे टाळावे? १. ज्या फळांमध्ये फ्रुक्टोज जास्त आहे असे केळी, आंबा, चिकू, पपई अशी फळं कमी खावीत किंवा खाणे टाळावे.

२. पॅक ज्यूस किंवा पॅक फूड, प्रोसेस्ड फूडचा वापर टाळावा.

केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

३. इंस्टंट ओट्स, इंस्टंट पास्ता, इंस्टंट नूडल्स असे पदार्थ खाणे टाळावे. प्लेन ओट्स घरी आणून ते शिजवून खाणे चांगले. 

४. डायबिटीस नियंत्रणात नसेल तर डेअरी प्रोडक्टचा वापर टाळावा. आजार नियंत्रणात येईपर्यंत वेगन डाएट घेतले तरी चालेल.  

 

टॅग्स : आरोग्यमधुमेहहेल्थ टिप्सअन्न