Join us   

चहाऐवजी खा ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक, सकाळी उठताच चहा पिण्याची सवय फार घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 3:22 PM

5 foods are safe to eat in the morning on empty stomach : सकाळी उठल्यावर काही ठराविक गोष्टी खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

सकाळी उठल्यावर आपल्यापैकी अनेक जण चहा किंवा कॉफी घेतात. काही जण काहीच न घेता फक्त ग्लासभर कोमट पाणी पितात. नंतर ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण हे रुटीन ठरलेलेच असते. पण सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी कोणता आणि काय आहार घ्यावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण सकाळी उठल्यावर काय खातो हे महत्त्वाचे असते (5 foods are safe to eat in the morning on empty stomach).

रात्री साधारण ८ ते १० च्या दरम्यान जेवण झाल्यानंतर साधारण १० तास आपल्या पोटात काहीच नसते. अशावेळी आपण चहा किंवा कॉफी घेतल्यास आपल्याला अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर काही ठराविक गोष्टी खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहण्यास आणि दिवस फ्रेश राहण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. पाहूयात सकाळी उठल्यावर नेमकं काय खायला हवं . 

१. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिजम चांगला राहून वजन कमी होण्यास मदत होते. 

२. सकाळी उठल्या उठल्या दलिया किंवा ओटमील खाणे आरोग्यासाठी चांगले असते. या दोन्ही पदार्थांमध्ये फायबर असते, त्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. तसेच रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. 

३. सकाळी उठल्या उठल्या ड्रायफ्रूटस खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. यामध्ये बदाम, आक्रोड, काळे मनुके यांशिवाय इतर सुकामेव्याचा समावेश करता येतो. यामध्ये हेल्दी फॅटस, प्रोटीन आणि फायबर्स असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. चहा किंवा कॉफीला चांगला पर्याय शोधत असाल तर ग्रीन टी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यामुळे मेटाबॉलिजम वाढतो, तसेच यातील अँटीऑक्सि़डंटसमुळे वाढलेले फॅटस कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

५. दही किंवा अंडी हाही सकाळी उठल्यावर खाण्यासाठी चांगला पर्याय आहे. या दोन्हीमुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. तसेच यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण चांगले असल्याने शरीरातील प्रोटीनची पातळी टिकून राहण्यास मदत होते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल