Join us

दूध-दह्यापेक्षा पाचपट जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; हाडं बळकट -पोलादी होईल शरीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 14:21 IST

5 foods provide 5 times more calcium than milk : बदाम आणि अंजिर यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. कॅल्शियम रिच फूड्सचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी शरीर मिळवू शकता

जेव्हा कधीही कॅल्शियमयुक्त पदार्थांबाबत बोलले जाते तेव्हा दूध, दही, पनीर या पदार्थांचे नाव सगळ्यात आधी ओठांवर येते. डेअरी प्रोडक्ट्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. पण अन्य व्हेजिटेरियन फुड्समध्येही कॅल्शियम भरपूर असते. बदाम आणि अंजिर यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. कॅल्शियम रिच फूड्सचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी शरीर मिळवू शकता. (Best Foods For Calcium)

मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार कॅल्शियम शरीरातील महत्वपूर्व घटकांपैकी एक आहे. कॅल्शियम हाडांपासून दातांपर्यंत ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. युएसच्या नॅशनल हेल्थ इंस्टीट्यूटच्या सल्ल्ल्यानुसार वयस्कर लोकांनी रोज आपल्या डाएटमध्ये १००० एमजी कॅल्शियमचा समावेश करावा ज्यामुळे शरीर कमकुवत होत नाही.  कॅल्शियम खाण्यापिण्याच्या पदार्थांमधून मिळवू शकता. (5 foods provide 5 times more calcium than milk)

बेस्ट कॅल्शियम रिच फूड्स

1) चिया सिड्स

चिया सिड्स दिसायला लहान दिसतात पण कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. २ मोठे चमचे चिया सिड्समध्ये जवळपास  १७९ मिलीग्राम कॅल्शियम असते. चिया सिड्समध्ये बोरोनसुद्धा असते.  ज्यामुळे शरीराला कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम मिळते आणि मेटाबॉलिझ्म स्ट्राँग होण्यास मदत होते. याशिवाय हाडं, मसल्स मजबूत राहतात. 

2) बदाम 

असं म्हटलं जातं की बदाम मेंदूला तेज बनवतात पण बदाम खाल्ल्याने फक्त मेंदू नाही तर हाडंसुद्धा चांगली  राहतात. फक्त१ कप बदामात  ३८५ मिलीग्राम कॅल्शियम असे. तर तुम्ही हेल्दी  पद्धतीने बदाम खाणं सुरू केलं तर शरीराला ताकद मिळेल. बदामात कॅलरीज आणि फॅट्सही कमी असतात. बदामाचे सेवन योग्य प्रमाणात करायला हवे. 

3) अंजीर

सुक्या अंजीरांना कॅल्शियमचे भंडार मानले जाते. १ कप अंजीरमध्ये २४१ मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे तब्येत चांगली राहते. अंजीरमध्ये फायबर्स, एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे आजारांपासून लढता येते. अंजीर खाल्ल्याने  फक्त हाडं चांगली राहत नाही तर मसल्सही मजबूत होतात. ओव्हरऑल आरोग्याला फायदे मिळतात. 

4) सोयाबीन

सोयाबीनपासून तयार झालेला टोफू कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. एक्सपर्ट्स सांगतात की अर्धा कप टोफूमध्ये २७५ मिलीग्राम कॅल्शियम असते. टोफू खाल्ल्याने शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे मिळतात. शरीर देखिल मजबूत राहते. 

5) प्लांट बेस्ड मिल्क

प्लांट बेस्ड मिल्कमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. १ कप फोर्टिफाईड सोया मिल्कमध्ये गाईच्या दुधाइतकेच कॅल्शियम असते. याशिवाय यात सुर्यफुलाच्या बीया, ब्रोकोली, तिळाच्या बिया, भंडी, संत्री मोठ्या प्रमाणात असते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल