Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किडनीच्या कार्यात अडथळा आणणारे ५ पदार्थ, वाढत्या युरीक ॲसिडचा शरीरावर होतो गंभीर परिणाम...

किडनीच्या कार्यात अडथळा आणणारे ५ पदार्थ, वाढत्या युरीक ॲसिडचा शरीरावर होतो गंभीर परिणाम...

5 Foods Should Avoid For Kidney Problems : किडनीच्या कार्यात अडथळे आणणारे पदार्थ टाळलेलेच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 09:46 AM2023-02-13T09:46:01+5:302023-02-13T10:46:04+5:30

5 Foods Should Avoid For Kidney Problems : किडनीच्या कार्यात अडथळे आणणारे पदार्थ टाळलेलेच बरे

5 Foods Should Avoid For Kidney Problems : 5 foods that hinder kidney function, increasing uric acid has serious effects on the body... | किडनीच्या कार्यात अडथळा आणणारे ५ पदार्थ, वाढत्या युरीक ॲसिडचा शरीरावर होतो गंभीर परिणाम...

किडनीच्या कार्यात अडथळा आणणारे ५ पदार्थ, वाढत्या युरीक ॲसिडचा शरीरावर होतो गंभीर परिणाम...

किडनी हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असतो. रक्तशुद्धी करण्याचे महत्त्वाचे काम किडनीच्या माध्यमातून केले जाते. किडनी एकदा खराब झाली की शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आपला आहार-विहार चांगला असेल तर सगळ्याच अवयवांचे कार्य सुरळीत राहते. किडनी खराब झाली की इतर अवयवांवही त्याचा ताण येतो आणि तेही निकामी होण्यास सुरुवात होते. किडनीतील फिल्टर खराब झाल्यास युरिक अॅसिड, अमोनिया, युरिया क्रिएटीनिन, अमिनो अॅसिड, सोडियम, पाणी वाढते. याचा आरोग्यावर गंभीर परीणाम होतो. आहारातील काही घटकांचा किडनीवर परिणाम होत असून हे घटक कोणते आणि ते नियंत्रणात राहण्यासाठी काय करायला हवे याविषयी समजून घेऊया (5 Foods Should Avoid For Kidney Problems). 

१. केळं 

 अनेकांना नियमितपणे केळं खाण्याची सवय असते. मात्र केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनीची समस्या वाढण्याची शक्यता असते. पोटॅशियममुळे किडनीतील फिल्टर खराब होण्याची शक्यता असल्याने किडनीशी निगडीत समस्या असलेल्यांनी केळं खाणं टाळावं. 

(Image : Google)
(Image : Google)

२. सालासहित बटाटा

बटाट्यामध्ये पोटॅशियम जास्त असते, बटाट्यापेक्षा त्याच्या सालांमध्ये पॉटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. हॉचेलमध्ये किंवा घरातही सालं न काढता बटाटे खाण्याची पद्धत असते. मात्र ती किडनीसाठी घातक ठरु शकते. 

३. दूध आणि दही 

दूध किंवा दही आरोग्यासाठी चांगले असते, त्यातून शरीराला प्रोटीन आणि इतर घटक मिळतात. हे जरी खरे असले तरी यातील काही घटकांचा किडनीवर विपरीत परिणाम होतो आणि किडनीच्या कार्यात बिघाड होतो. त्यामुळे किडनीचा त्रास असणाऱ्यांनी दूध आणि दही यांसारख्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

४. टोमॅटो 

आपण कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आवर्जून वापरतो. मात्र एका टोमॅटोमध्ये २९० मिलीग्रॅम पोटॅशियम असते, त्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असल्याने टोमॅटोचा आहारात जपून वापर करावा. 

५. हरभरा डाळ 

हरभरा डाळीचा किंवा डाळीच्या पिठाचा वापर आपण स्वयंपाकात सर्रासपणे करतो. मात्र हरभरा डाळ किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असते. १ कप शिजवलेल्या हरभरा डाळीत ७३० मिलीग्रॅम पोटॅशियम असते. त्यामुळे किडनीवर ताण येतो. म्हणून किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी हरभरा डाळ शक्यतो टाळलेलीच चांगली.  
 

Web Title: 5 Foods Should Avoid For Kidney Problems : 5 foods that hinder kidney function, increasing uric acid has serious effects on the body...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.