हाडं हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा घटक असून हाडांच्या साच्यावरच शरीराचा संपूर्ण भार पेललेला असतो. ही हाडं मजबूत असतील तर ठिक नाहीतर हाडांच्या काही ना काही तक्रारी सुरु होतात आणि मग गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यांमुळे आपण हैराण होऊन जातो. अनेकदा कमी वयातच हाडं दुखायला सुरुवात होते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण एकतर ती हाडं ठिसूळ झालेली असतात आणि त्यांना पुरेसे कॅल्शियम, डी व्हिटॅमिन असे पोषण मिळत नसल्याने ती कमी वयात कमकुवत होतात. शरीराला कॅल्शियम पुरवणारे काही घटक आहारात आवर्जून असायला हवेत. किमान कॅल्शियम देणारे नसतील तरी तो शोषून घेणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. नाहीतर मग हाडांची दुखणी आणि त्यावर वर्षानुवर्षे उपचार असेच चक्र कित्येक दिवस चालू राहते. पाहूयात हाडांसाठी घातक असणारे पदार्थ कोणते (5 Foods That block Calcium absorption in Body)...
१. प्रोटीन
हाडांच्या मजबुतीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते. पण खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेतले तर त्याचाही शरीराला त्रास होऊ शकतो. हाय प्रोटीन डाएट घेतलं तर कॅल्शियमच कमतरता जाणवते.
२. नमकीन खाद्यपदार्थ
खूप जास्त प्रमाणात नमकीन म्हणजेच सोडीयम असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि हाडे कमकुवत होतात. त्यामुळे प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड आणि मीठ असलेल्या पदार्थांचे कमीत कमी सेवन करायला हवे. दररोज २३०० मिलीग्रॅमहून जास्त मिठाचे सेवन करु नये.
३. पालक आणि ऑक्सालेट असलेले पदार्थ
आपले शरीर पालकासारख्या हाय ऑक्सलेट खाद्य पदार्थ कॅल्शियम चांगल्याप्रकारे शोषून घेत नाहीत. त्यामुळे इतर कारणांसाठी पालक उपयुक्त असला तरी कॅल्शियमसाठी तो म्हणावा तितका चांगला नाही.
४. गव्हाचा कोंडा
गव्हाच्या कोंड्यात फाइटेटस जास्त प्रमाणात असते. या कोंड्यामुळे शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यात अडचणी निर्माण होतात. जेव्हा आपण दूध आणि १०० टक्के कोंडा असलेले धान्य एकावेळी खातो तेव्हा आपले शरीर दूधातील कॅल्शियम शोषू शकत नाही.
५. कॉफी, चहा, सॉफ्ट ड्रींक
दररोज ३ कपांपेक्षा जास्त कॉफी पिण्याने शरीरात इतर पदार्थांतील कॅल्शियम शोषला जाण्यात अडथळे येतात. त्यामुळे हाडांचे नुकसान होण्याची शक्यता असते. चहा आणि कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असते जे आरोग्यासाठी फारसे चांगले नसते.