Join us   

लहान वयातच चष्मा लागला-नजर कमजोर झाली? रोज खा ५ व्हेज पदार्थ, चष्म्याचा नंबर होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 5:24 PM

5 Foods That Can Help Improve Your Eyesight : खाण्यापिण्यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात जी डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असतात.

दृष्टी कमकुवत होण्याची अनेक कारणं असू शकतात. लहान मुलं असो किंवा मोठे प्रत्येकालाच वाढत्या वयात डोळ्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते.  लहानपणापासूनच गरजेपेक्षा जास्त टिव्ही पाहणं, मोबाईल बघणं, एकटक स्क्रीन पाहत राहणं, डोळे चोळणं, खाण्यापिण्यात पोषक तत्वांचा अभाव यामुळे कमी वयातच चष्मा लागतो. (Eyesight Increasing Foods in 5 Foods Beside Carrot To Improve Eyesight)

खाण्यापिण्यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात जी डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असतात. (Best Foods To Improve Eyesight Naturally) ज्यातून डोळ्यांना व्हिटामीन्स, ओमेगा-३ फॅटी एसिड्सस, व्हिटामीन ई, व्हिटामीन सी, व्हिटामीन ए आणि जिंक याबरोबर एंटी ऑक्सिडेंट्सही मिळतात. डोळे चांगले ठेवण्यासाठी कोणते ५ पदार्थ खावेत. (5 Foods That Can Help Improve Your Eyesight)

१) अक्रोड

डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि नजर तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकता. अक्रोडममध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. यातून जिंक, व्हिटामीन ई यांसारखे अनेक फायदेशीर तत्व मिळतात.  स्नॅक्सप्रमाणे तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता.

२) रताळे

हेल्दी पदार्थांमध्ये रताळ्यांचा समावेश होतो. रताळ्यांमध्ये बीटा कॅरोटीन असते. यामुळे डोळ्यांना बरेच फायदे मिळतात. रताळ्यातील बीटा कॅरोटीन डोळ्यांचे प्रोब्लेम्स कमी होण्यास मदत होते. 

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

३) गाजर

गाजर बीटा कॅरोटीनने परिपूर्ण असते. जे व्हिटामीन ए चा सर्वात चांगला स्त्रोत आहे. व्हिटामीन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. नाईट ब्लाईंडनेसचा त्रास कमी होतो. गाजराव्यतिरिक्त इतर नारंगी पदार्थ  रताळे, भोपळा बीटा कॅरोनीटचा उत्तम स्त्रोत आहेत. 

ऑफिसमध्ये तासनतास बसून पोट सुटलंय? जागेवरच उभं राहून ३ व्यायाम करा, मेंटेन होईल फिगर

४) पालक

पालक ल्युटीन आणि जेक्सॅथिनने परिपूर्ण असते. हे दोन एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त पदार्थ  दृष्टी सुधारण्यासाठी, मोतिबिंदूचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात. एंटी ऑक्सिडेंसयुक्त पालकाच्या सेवनाने रेटिनाला ब्लू रेज पासून होणारं नुकसान टाळता येतं. 

५) ब्रोकोली

व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण ब्रोकोली व्हिटामीन ए  चा एक चांगला स्त्रोत आहे.  वाढत्या वयात उद्भवणारे डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी ब्रोकोली खायला हवी. यात प्रोटीन्सची भरपूर प्रमाणात असता. भाजी किंवा सूपमध्ये घालून ब्रोकोलीचे सेवन करा.  याशिवाय ड्रायफ्रुट्स, संत्री, लिंबू  अशा पदार्थांचे सेवन करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यडोळ्यांची निगा