Join us   

कायम तरुण दिसायचं तर न चुकता खा ५ पदार्थ, वय वाढल्याची खुण चेहऱ्यावर दिसणार नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 1:28 PM

5 Foods That Can Help You Look Younger आपला आहार हेच औषध, तरुण आणि फिट राहायचे तर न कंटाळता खा ५ गोष्टी

वय वाढलं तरी आपण चिरतरुण, सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत. काही लोकांचं वय लवकर दिसून येत नाही. तर काहींच्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. आपलं तारुण्य गमावू नये म्हणून आपण हवी ती धडपड करतो. महागडे प्रॉडक्ट्स व स्किन केअरची काळजी घेतो. पण कधी - कधी कोणत्याही उपचाराचा काहीच फायदा होत नाही. वय वाढलं की, त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे, कमी दिसणे, ही लक्षणे निदर्शनास येतात.

याला कारणीभूत आपली बिघडलेली जीवनशैली देखील असू शकते. अशा वेळी काय करावं हे सुचत नाही. तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी फक्त प्रॉडक्ट्स नाही तर, आहाराची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी ५ अँटी एजिंग फूडची माहिती दिली आहे. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल(5 Foods That Can Help You Look Younger).

पपई

पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, जे वाढत्या वयाच्या लक्षणांपासून बचाव करण्यास मदत करते. हे फळ लाइकोपीन सारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहे, ज्यात वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्याचे घटक आहे. त्यामुळे आहारात पपईचा समावेश करा.

चिमूटभर दालचिनी - चमचाभर मध, भाग्यश्री सांगते हाय बीपी नियंत्रित ठेवण्याचा उपाय

डाळिंब

डाळिंबात प्युनिकलॅजिन्स नावाचे एक संयुग असते, जे त्वचेतील कोलेजन वाढवते. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसून येत नाही. आपण दररोज डाळिंबाचा रस पिऊ शकता.

दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतात. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा सुंदर आणि मजबूत बनवण्याचे काम करते. रिबोफ्लेविन किंवा व्हिटॅमिन बी १२ने समृद्ध दही त्वचा चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

उन्हाळ्यात लघवी करताना जळजळ होते? तांदळाच्या पाण्याचा १ उपयोग, आग होईल कमी

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारे क्लोरोफिल त्वचेतील कोलेजन वाढवते. ज्यामुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत मिळते. त्वचा व आरोग्यासाठी नियमित पालेभाज्या खा. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात लाइकोपीन असते. जे सूर्य किरणांमुळे त्वचेवर होणाऱ्या नुकसानीपासून रोखते. याशिवाय, टोमॅटो व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, जे कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे टोमॅटो खा व चेहऱ्यावर देखील लावा.

 

टॅग्स : ब्यूटी टिप्सअन्न