सामान्य वाटणारी पण पोटाला त्रास देणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation). आजकाल खाण्या-पिण्याच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे याची समस्या वाढत चालली आहे. बद्धकोष्ठतेवर त्वरित उपचार न घेतल्यास हा त्रास मूळव्याधीत रुपांतरीत होऊ शकते. त्यामुळे वेळीच पोटाची काळजी घेतलेली बरी. पोटाचे विकार वाढताच आपण बऱ्याच काही गोष्टी करून पाहतो. पण पोट व्यवस्थित साफ होत नसेल, शिवाय शौचास जाताना त्रास होत असेल तर, यावर उपाय म्हणून ५ फळे खा.
काहींना गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, उलट्या, पोटदुखी, पोटात गोळे येणे, पोटात जंत होणे यांसारख्या समस्याही छळतात (Fruits for Stomach Health). जर आपण देखील या समस्येपासून त्रस्त असाल तर, पोषणतज्ज्ञ रितू त्रिवेदी यांनी सांगितलेल्या ५ फळांचा आहारात समावेश करून पाहा. या फळांमुळे पोटातील घाण साफ होईल(5 foods that can help you poop and relieve constipation).
पपई
पपईमध्ये फायबर जास्त पण कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय त्यात पाण्याचेही प्रमाण जास्त असते. त्यात पॅपेन नावाचे एंजाइम असते, जे पचन सुधारते. जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, आपण चिया सीड्ससोबत पपईच्या फोडी खाऊ शकता. यामुळे पोटाला आराम मिळेल.
तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन
सफरचंद
तज्ज्ञांच्या मते, सफरचंद सालीसोबत खावे. याचा थेट फायदा आरोग्याला होतो, शिवाय पोटाचे विकारही दूर राहतात. सालीमध्ये न विरघळणारे फायबर असते. त्यामुळे आतड्याचे कार्य सुरळीत होते. यासह बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते.
संत्री
संत्री हे फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर, नियमित एक संत्री खा. संत्र्यामध्ये नारिंजेनिन संयुग असते, जे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते. शिवाय संत्र्यातील फायबरमुळे पचनसंस्था सुधारते.
पायऱ्या जा चढत- वजन घटेल झरझर; पण वजन कमी करण्यासाठी किती मिनिटे पायऱ्यांचा व्यायाम करावा?
नाशपती
नाशपती खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. यामध्ये अनेक पौष्टीक तत्व असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. यामध्ये फायबर फ्रक्टोज आणि सॉर्बिटॉल सारखे घटक आढळतात, जे आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.
केळी
बद्धकोष्ठतेवर पिकलेली केळी फायदेशीर ठरते. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येत नाही. जर आपण देखील पोट साफ न होण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर, नियमित एक पिकलेली केळी खा.