Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जरा चालले की दम लागतो? रोज खा आणि प्या ५ पदार्थ, वाढेल ताकद आणि धावू लागाल जोरात

जरा चालले की दम लागतो? रोज खा आणि प्या ५ पदार्थ, वाढेल ताकद आणि धावू लागाल जोरात

5 foods that can increase your stamina : थकवा दूर करून शरीराला त्वरित उर्जा प्रदान करणारे ५ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2024 12:09 PM2024-02-01T12:09:12+5:302024-02-01T12:10:01+5:30

5 foods that can increase your stamina : थकवा दूर करून शरीराला त्वरित उर्जा प्रदान करणारे ५ पदार्थ

5 foods that can increase your stamina-check out list | जरा चालले की दम लागतो? रोज खा आणि प्या ५ पदार्थ, वाढेल ताकद आणि धावू लागाल जोरात

जरा चालले की दम लागतो? रोज खा आणि प्या ५ पदार्थ, वाढेल ताकद आणि धावू लागाल जोरात

झोपून उठल्यानंतर सकाळी फ्रेश आणि आनंदमयी दिवस जायला हवे. पण बऱ्याचदा तसे होत नाही. अनेकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो, किंवा आळसात दिवस जातो. पण असे का होते? याचा विचार आपण कधी केलाय का? शरीरात थकवा जाणवल्यानंतर आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते (Stamina). शिवाय दिवसभरातील अनेक कामे रखडली जातात. मुख्य म्हणजे या करणामुळे आपल्याला विविध आजार ग्रासतात.

काम करण्याची उर्जा आपल्याला अन्नपदार्थातून मिळते, आणि त्यामुळे पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे (Health Tips). लखनऊच्या आहारतज्ज्ञ शीतल गिरी यांनी अशक्तपणा दूर करणाऱ्या पदार्थांची नावे सांगितली आहे. या पदार्थांमुळे नक्कीच शरीर तंदुरुस्त होईल(5 foods that can increase your stamina).

शरीराची कमजोरी दूर करणारे पदार्थ

प्रोटीन-रिच फूड

शरीराला उर्जा हवी तर, आपण प्रोटीनयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. आपण नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकता. यासाठी चीज, सोयाबिन, मोड आलेलेल कडधान्य, यासह विविध प्रकारच्या डाळी खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील, शिवाय थकवाही दूर होईल.

खा मेथी व्हा बारीक! हिवाळ्यात मेथी खा भरपूर - पोट होईल कमी आणि वजनही उतरेल

कार्ब्स आणि फॅट बॅलेन्स

वजन वाढू नये म्हणून कमी कार्ब्स आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. आपल्या आहारात हेल्दी फॅट्स आणि कार्ब्सयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. यासाठी पराठे, अक्रोड, तूप आणि दही नियमित खा.

व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ

व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ एकूण आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ फक्त रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर हाडे, डोळे आणि त्वचा देखील निरोगी बनवते. यासाठी नियमित आवळा, लिंबू, संत्री आणि हिरव्या भाज्या खा.

पाणी प्या

पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते, ज्यामुळे थकवा कमी होतो. याशिवाय पाणी प्यायल्याने ऊर्जा मिळते. पिण्याच्या पाण्यासोबतच रसदार फळे आणि भाज्या खाव्यात, नारळपाणी प्यावे आणि दिवसातून एकदा ताक प्यावे.

सकाळी ५ चुका करता म्हणून भरभर वाढते वजन, व्यायाम आणि डाएटचाही होणार नाही असर

नट्स आणि सीड्स

हाडं मजबूत करण्यासाठी फळे, नट्स आणि हेल्दी सीड्स खायला हवे. या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रथिने आणि लोह असते. ज्यामुळे शरीरात उर्जा तर वाढतेच, शिवाय आरोग्याला अनेक प्रकारचे फायदेही मिळतात.

Web Title: 5 foods that can increase your stamina-check out list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.