लिव्हरशी संबंधित कोणताही त्रास संपूर्ण शरीरासाठी धोकादायक ठरू शकताो. लिव्हर पचनासाठी आणि चयापचन व्यवस्थित करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. सुस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मद्याचे अतिसेवन, व्हायरल संक्रमण या कारणांमुळे लिव्हर खराब होऊ शकते. (Liver Detox Home Remedy) लिव्हरद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
याचा अर्थ असा की लिव्हरमध्ये घातक विषारी पदार्थ जमा होण्याचा धोका जास्त असतो. अतिप्रमाणात टॉक्सिन्स जमा होणं गंभीर आजाराचं कारण ठरू शकतं डॉक्टर कपिल त्यागी यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना प्रभावशाली आयुर्वेदीक जडी बूडींद्वारे लिव्हर डिटॉक्स करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. (5 Foods That Cleanse Or Detox Liver Naturally)
लिव्हर फॅट कमी कमी करून पचनक्रिया चांगली ठेवते. (How To Detox Your Liver Naturally) यामुळे रक्तातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. लिव्हरची योग्य प्रकारे स्वच्छता न केल्यास सिरोसिस, हेपेटाइटिस, अल्कोहलिक हेपेटाइटिस और नॉन-अल्कोहलिक फॅटी लिव्हर असे जीवघेणे आजार होऊ शकतात. लिव्हर स्वच्छ असल्यास आरोग्य चांगले राहते आणि निरोगी दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते.
लिव्हर डिटॉक्स कसे करायचे
- हळद अन्नाची चव आणि रंग वाढवते, त्यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात आणि म्हणूनच ती लिव्हरच्या सर्व ऊती आणि पेशी सुधारण्याचे कार्य करते. त्वचा, पचन, यकृत आणि मेंदूसाठी हळद खूप फायदेशीर आहे.
- लिव्हर स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी आहार घेणे आणि सक्रिय जीवनशैलीचे. याशिवाय, यकृत निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहोलचे सेवन टाळणे हा एक सोपा उपाय आहे.
- लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी भुम्यमालकी एक प्रभावी आयुर्वेदीक जडीबूडी आहे. याचा प्रभाव थंड आणि सुखद असतो. यातील गुणधर्म पित्त आणि कफ शांत करण्यात मदत करतात. यामुळे लिव्हरमधील पित्ताशियाची पिशवी स्वच्छ राहते. याशिवाय विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि लिव्हर मजबूत राहते.
- कुटकी ही आयुर्वेदिक जडीबुटी शरीरासाठी औषधापेक्षा कमी नाही. कुटकीच्या गुणधर्मांचा यकृत आणि पित्त मूत्राशय या दोन्हींवर परिणाम होतो. हे लिव्हरसाठी हे एक शक्तिशाली टॉनिक मानले जाते जे रक्त शुद्ध करते.
- गुडुची ही एक शक्तिशाली डिटॉक्स औषधी वनस्पती आहे, जी यकृत आणि मूत्रपिंड मजबूत आणि शुद्ध करण्यासाठी कार्य करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
- आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. त्यात वाढलेलं पित्त शांत करण्याची क्षमता असते. हे पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. हे यकृताच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते.