हेल्दी राहण्यासाठी व्यायाम आणि डाएटकडे लक्ष द्यायला हवे (Sleeping Tips). पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यायला जमेलच असे नाही. यामुळे वजन वाढते शिवाय गंभीर आजारांचाही धोका वाढतो (Weight Loss). वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आणि डाएट नसून, झोप देखील महत्वाची ठरते (Health care).
आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. कामाच्या व्यायापामुळे डाएट, व्यायाम आणि झोपेचे तीनतेरा वाजतात. पण वेट लॉससाठी झोप का महत्वाची? झोपेचं खोबरं झाल्यावर शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो का? जर झोप अपुरी होत असेल तर, आणि झोप येण्यासाठी कोणते पदार्थ खावे? पाहा(5 foods that help in inducing deep sleep).
झोपेच्या कमतरतेमुळे काय होते?
झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि नैराश्य इत्यादींसह अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याशिवाय आपल्या दैनंदिन कामावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी खाण्याव्यतिरिक्त झोपेची काळजी घेणं आवश्यक आहे. झोपेसाठी कोणते सुपरफुड्स मदत करतील?
एका दिवसात जास्तीत जास्त किती साखर खावी? शरीराला किती साखरेची गरज असते?
ओट्स
आपण उत्तम झोपेसाठी ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आढळते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. त्यात मेलाटोनिन देखील असते. जे झोपेसाठी मदत करते.
केळी
केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. जे नैसर्गिक स्नायूंना आराम देतात. केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन देखील असते. जे शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे विश्रांती आणि झोपेला प्रोत्साहन देते.
शरीरात होणारे ५ बदल देतात लिव्हर डॅमेजचे संकेत! वेळीच ओळखा - टळेल नुकसान
बेरीज
बेरीज हे मेलाटोनिनमध्ये समृद्ध असतात. जे झोपण्याच्या चक्रावर नियंत्रण ठेवते. जर आपल्याला झोपण्याची समस्या असेल तर, आपण मुठभर चेरी खाऊन झोपू शकता. किंवा चेरीचा रस प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.
बदाम
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण बदाम खातोच. शिवाय त्यात मॅग्नेशियम देखील असते. जे झोपेच्या गुणवत्तेशी जोडलेला आहे. यासह स्नायूंना आराम करण्यास आणि शांततेची भावना वाढविण्यास मदत करते. ज्यामुळे झोप उत्तम लागते.