Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर..

रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर..

5 Foods To Avoid Before Sleeping! : हेल्दी वाटणारे हे पदार्थ रात्री अजिबात खाऊ नका, तज्ज्ञ सांगतात 'द्याल गंभीर आजारांना आमंत्रण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 01:31 PM2023-12-21T13:31:34+5:302023-12-21T13:33:12+5:30

5 Foods To Avoid Before Sleeping! : हेल्दी वाटणारे हे पदार्थ रात्री अजिबात खाऊ नका, तज्ज्ञ सांगतात 'द्याल गंभीर आजारांना आमंत्रण'

5 Foods To Avoid Before Sleeping! | रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर..

रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर..

रात्रीचे जेवण (Dinner) सकाळ आणि दुपारच्या जेवणापेक्षा पूर्णपणे वेगळे असावे. शिवाय नाश्ता, लंच आणि डिनरमध्ये काही वेळेचा अंतर असावा. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लंच आणि डिनर करण्याच्या वेळापत्रकात बऱ्याचदा बदल होतो. शिवाय नाश्ता, लंच आणि डिनरमध्ये काय खावे, काय खाणं टाळावे? याची माहिती आपल्याला नसते (Foods to avoid at Dinner).

बरेच लोकं भूक लागल्यावर उलट सुलट पदार्थ खातात. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे आपण गंभीर आजारांना आमंत्रण देतो. यामुळे आपले हेल्थ लेव्हल पूर्वीच्या लोकांपेक्षा खूप कमजोर झाले आहे. रात्री बर्याचदा आपण अशा काही गोष्टी खातो, ज्यामुळे आरोग्य आणखीन बिघडण्याची शक्यता असते(5 Foods To Avoid Before Sleeping!).

यासंदर्भात आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामोनी सांगतात, 'रात्रीच्या जेवणात ५ पदार्थ खाऊ नका. हेल्दी वाटणाऱ्या या अनहेल्दी पदार्थांमुळे आपले वेट गेन, मधुमेह, आतड्यांच्या समस्या, हार्मोन्सचे असंतुलन यांसारखे आजार निर्माण होऊ शकतात.'

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

रात्रीचे जेवण करताना काय खाऊ नये?

गहू

आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, 'गहू पचनसंस्थेसाठी जड असते. गव्हाच्या पिठापासून तयार पदार्थ लवकर पचत नाही. यामुळे अनेकदा पोट बिघडण्याची समस्या वाढते. शिवाय पोटाच्या विकारामुळे इतरही गंभीर आजार निर्माण होतात.'

दही

रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पित्त वाढू शकते. जर आपल्याला सर्दी-खोकला झाला असेल तर, दही आहारातून वगळणे उत्तम ठरू शकते. जर आपल्याला दही खायचं असेल तर, त्यात जिरे आणि काळी मिरी पावडर मिक्स करून खा. पण रात्रीच्या वेळेस शक्यतो दही खाणं टाळाच.

मैदा

मैदा आरोग्यासाठी घातक ठरते. मैद्याचा वापर करून विषाक्त पदार्थ तयार होतात. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. शिवाय मैदाचा वापर करून तयार केलेले पदार्थ पचायला फार जड असतात. यामुळे लठ्ठपणा, मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नान, समोसा, मोमो, नूडल्स इत्यादी पदार्थ खाऊ नका.

बैठ्या कामाच्या नोकरीने बसून बसून मागचा भाग वाढला? फक्त १० मिनिटं करा १ सोपा व्यायाम

चॉकलेट

गोड पदार्थ पचायला कठीण असतात. या पदार्थांमुळे फुफ्फुसात आणि खालच्या श्वसनमार्गामध्ये श्लेष्मा जमा होऊ लागतो. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने हृदयविकार, किडनीचे आजार, ऊर्जेची कमतरता यासह ड्राय स्किनची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शक्यतो साखरयुक्त पदार्थ खाणं टाळा.

रात्रीच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश

रात्रीच्या जेवणात हिरव्या चटणीसोबत व्हेज टिक्की आणि डाळीचे सूप प्या. पदार्थ पचायला जे हलके असतील, ते पदार्थ खा. शिवाय रात्रीचं जेवण नेहमी ८ वाजेच्या आत करावे.

Web Title: 5 Foods To Avoid Before Sleeping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.