Join us   

दुधासोबत अजिबात खाऊ नये असे ५ पदार्थ, पोटात तयार होईल विष, बिघडेल आरोग्य..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 10:20 AM

5 foods to avoid consuming with milk : दूध आरोग्यासाठी उत्तम, पण त्यासोबत ५ पदार्थ खाल, तर पोटासाठी ठरेल अपायकारक

दुधात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि फॅट असते. नियमित दूध प्यायल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा तर मिळतेच, शिवाय पौष्टीक घटकांमुळे आरोग्याला फायदाच होतो. पण बऱ्याच वेळेस आपण खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करतो, ज्यामुळे हेल्दी पदार्थही आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात. दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम पण, दूध प्यायल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. दुधासह कोणते पदार्थ खाणे टाळावे?

यासंदर्भातील माहिती देताना डॉ.रेखा राधामोनी सांगतात, 'दूध पचायला जड असते. ज्यांना पोटाशी संबंधित समस्या आहे त्यांनी दूध जास्त प्रमाणात पिऊ नये. दूध पिताना त्यात काही मिसळण्याची, किंवा त्यासोबत काही गोष्टी खाणं टाळलेलेच बरे. दूध नेहमी उकळवून प्या. जर आपल्याला म्हशीचे दूध पचत नसेल तर, गाय किंवा शेळीचे दूध प्या'(5 foods to avoid consuming with milk).

दुधासोबत किंवा नंतर काय खाऊ नये?

हिवाळ्यात काही लोकं पौष्टीक म्हणून दुधात साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. पण आयुर्वेदानुसार दुधात गुळ घालून पिणं आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं मानले जाते. यामुळे पित्त आणि कफ दोष वाढतो. शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

नियमित ३ गोष्टी खा, दात चमकतील मोत्यासारखे! पिवळ्या पडलेल्या दातांसाठी सोपा उपाय

व्हिटॅमिन सीयुक्त फळ

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पण दूध प्यायल्यानंतर लिंबूवर्गीय फळे खाऊ नये. यामुळे पचनाच्या निगडीत समस्या वाढू शकतात. शिवाय उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

मीठ

बरेच जण दूध पिताना स्नॅक्स खातात. पण स्नॅक्समध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. ज्यामुळे पोटाचे विकार वाढतात. आपण मिठाऐवजी रॉक सॉल्टयुक्त स्नॅक्स खाऊ शकता.

तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ

हिरवे मूग

प्रथिनांनी समृद्ध हिरवे मूग डाळ आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पण दुधासोबत हिरवे मूग खाऊ नये. हिरवे मूग आणि दूध पचायला फार जड असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात. 

टॅग्स : दूधहेल्थ टिप्सआरोग्य