Join us   

दही-उसळी-पालेभाज्या रोज खाता? कॉन्स्टिपेशन-मूळव्याधीचा धोका, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 5:16 PM

5 Foods to Avoid for Constipation Relief पौष्टिक म्हणत आपल्या तब्येतीला न पचणारं आपण खातो का, याचा विचार करा, पचन बिघडलं तर..

असे मानले जाते की अर्ध्याहून अधिक आजार हे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात. आयुर्वेदात खाण्यापिण्याचे काही नियम आहेत, जर त्यांचे पालन न केल्यास आरोग्य देखील बिघडू शकते. खाणे म्हणजे फक्त पोट भरणे नव्हे. तर आपण कधी, किती, काय आणि कसे खाता, या गोष्टींचीही काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक वेळा सकस आहार घेतल्यावरही तब्येत बिघडते, शरीराला ताकद मिळत नाही, अशक्तपणा येतो, नेहमी थकवा आणि सुस्तपणा जाणवतो.

यासंदर्भात, आयुर्वेद डॉक्टर निजिला सांगतात, ''जर आपण नेहमी त्याच - त्याच प्रकारचे अन्न खात असाल तर, आपले आरोग्य बिघडू शकते. हे पदार्थ हेल्दी जरी असले तरी, यामुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जसे की बद्धकोष्ठता, मूळव्याध किंवा आतड्यांच्या संबंधित आजार होऊ शकतात''(5 Foods to Avoid for Constipation Relief).

दही

उन्हाळ्यात लोकांच्या आहारात दह्याचा समावेश होतो. पोट थंड व पाचन सुधारण्यासाठी दही उपयुक्त ठरते. मात्र, रोज दही खाल्ल्याने शरीरातील कफचे प्रमाण वाढते. त्यात फॅट देखील असते, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढू शकते. नियमित दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

पडल्या - पडल्या २ मिनिटात लागेल झोप, फॉलो करा सोपी लिएइसी टेक्नीक, शांत - गाढ झोपेसाठी बेस्ट पर्याय

जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या

बटाटा, मुळा, कांदा, या जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 

स्प्राउट्स

स्प्राउट्समध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि चरबीसारखे सर्व आवश्यक पोषक घटक आढळतात. परंतु ते दररोज खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवतो. स्प्राउट्समध्ये कोलाय बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते. जे आतड्यांतील आरोग्यासाठी घातक ठरते.

धाप लागते, श्वास कोंडतो - ५ गोष्टी करा तातडीने - सोपे लाईफस्टाईल बदल - श्वास घ्या मोकळा

पाले भाज्या

पालेभाज्या लोह आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक तत्वांचा खजिना आहे. परंतु पालेभाज्यांचं नियमित सेवनाने केल्याने शरीरात वात वाढू शकते. ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

व्हिनेगर

रोज व्हिनेगर पदार्थात मिसळून खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस्ट्रिक, अल्सर होण्याची शक्यता वाढते. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य