Join us   

गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ, हार्ट राहेल सुरक्षित- बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 5:04 PM

5 Foods to Boost Your Good Cholesterol बॅड कोलेस्टेरॉलची चिंता तर सगळेच करतात पण चांगलं कोलेस्टेरॉल वाढावं म्हणून हे उपाय

कोलेस्टेरॉलची समस्या सध्या सामान्य झाली आहे. कोलेस्टेरॉल वाढणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या संबंधित इतर आजार, स्ट्रोक यासारख्या जीवघेण्या समस्यांचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असते. एचडीएल कोलेस्ट्रॉल ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. आपल्या शरीरासाठी हे कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. कारण ते रक्तवाहिन्यांमधून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचत नाही. यासह खराब कोलेस्टेरॉल यकृतामध्ये पाठवण्याचं काम करते. ज्याद्वारे ते शरीराच्या बाहेर पडते.

एलडीएल कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातक ठरते. खराब कोलेस्टेरॉल नसांना ब्लॉक करण्याचं काम करते. ज्यामुळे रक्त प्रवाह थांबू शकतो. या कारणामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका वाढतो. यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी, शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे याबाबतीत माहिती दिली आहे(5 Foods to Boost Your Good Cholesterol).

चिया सीड्स

चिया सीड्स हे ओमेगा -3, फॅटी ऍसिडस्, फायबर व इतर निरोगी पोषक घटकांचा एक उत्तम स्रोत आहे. आहारात चिया बियांचा समावेश केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासह चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. इतकंच नाही तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.

छातीत दुखते, कळ येते - ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका, हार्ट अटॅकची तर ही लक्षणे नाहीत?

बार्ली

बार्ली हे एक धान्य असून, जे गहू समानच दिसायला असते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. हे एक एक विरघळणारे फायबर आहे, जे एचडीएल वाढवण्यास आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदते.

अक्रोड

अक्रोडात प्रामुख्याने ओमेगा-३ फॅट असते, जे एक प्रकारचे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. ज्यामध्ये हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्याची शक्ती असते. एकूण रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करते आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

सतत होणाऱ्या पित्ताच्या त्रासाने वैतागलात?१० उपाय - खवळलेले पित्त होईल शांत

सोयाबीन

सोयाबीन हे अनसैचुरेटेड फॅट आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय, त्यात उपस्थित आयसोफ्लाव्होन एचडीएल पातळी वाढवतात, व फायटोएस्ट्रोजेन्स एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करतात.

खोबरेल तेल

नारळाच्या तेलात नियमित स्वयंपाक केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. खोबरेल तेलाच्या प्रभावामुळे हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल