Join us   

पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून नियमित खा ५ गोष्टी, आजारपणं राहतील लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 6:28 PM

5 foods to boost your immunity this monsoon पावसाळ्यात सतत आजारी पडत असाल तर आहारात हव्यातच ५ गोष्ट

पावसाळ्यात अनेक प्रकारची रोगराई पसरते. या दिवसात आरोग्याची काळजी घ्यायला हवी. अनेक तज्ज्ञ बाहेरील पदार्थ खाण्यास टाळायला सांगतात. उलट - सुलट पदार्थ खाल्ल्यामुळे सर्दी - खोकला, ताप, यासह अन्य आजार देखील छळू शकतात. त्यामुळे हेल्दी पदार्थ खाणं आवश्यक आहे. हेल्दी पदार्थांमुळे शरीर आतून मजबूत राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह आजारांपासून बचाव होतो. शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावं काय टाळावं हे माहित असणं गरजेचं आहे.

आहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंह यांच्या मते, 'रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायामासह, काही फळांचे आहारात समावेश करा. आपण आहारात अँटी-ऑक्सिडंट्स समृद्ध अन्न समाविष्ट करू शकता. याशिवाय, व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते''(5 foods to boost your immunity this monsoon).

शरीरातील इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी खा ५ पदार्थ

अँटिऑक्सिडंट्स समृद्ध फूड

कांदा, लसूण, आले, गाजर आणि भोपळा यांसारख्या सुपरफूडमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, बी आणि ई देखील आढळते. यापैकी आपण कोणताही एक पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समावेश करू शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल, यासह संसर्गाशी लढण्यास मदत करेल.

सतत मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे ५ आजार तुम्हाला झालेच म्हणून समजा..

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ

व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. पेरू, संत्री, आवळा, बेरी, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांना आपल्या आहाराचा एक भाग बनवा. यामुळे आपली इम्युनिटी बुस्ट होईल.

हळद

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद आणि काळी मिरीचा आहारात समावेश करा. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते. यासाठी एक ग्लास पाण्यात हळद, दालचिनी, लवंग, वेलची, केशर इत्यादी साहित्य घालून चहा तयार करा. या चहामुळे शरीरातील इम्युनिटी बुस्ट होईल.

रोज मूग डाळ खाण्याचे ५ फायदे, मुगाचं वरण म्हणजे भरपूर पोषण

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे अनेक विषाणूजन्य रोग बरे करण्यासाठी प्रभावी ठरते. तज्ज्ञांच्या मते, सर्दी आणि फ्लू झाल्यास ज्येष्ठमधाचा वापर चहा बनवण्यासाठी करा.

लाल सिमला मिरची

लाल सिमला मिरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लाल सिमला मिरचीमध्ये लिंबूवर्गीय फळांपेक्षा तिप्पट जास्त व्हिटॅमिन सी असते. यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच डोळे निरोगी ठेवतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न