Join us   

कारली खा, पण त्यासोबत ‘हे’ ४ पदार्थ खाल्ले की पोट बिघडणारच- तब्येत इतकी बिघडेल की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 5:52 PM

5 foods you must avoid with bitter gourd (Karela) : कारल्यासोबत ५ पदार्थ खाताय; बेतेल आरोग्यावर कारण..

कारलं हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी, 'कडू' हा शब्द येतोच (Bitter Gourd). पण आरोग्यासाठी कारलं म्हणजे वरदान. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात (Food). ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारल्यातील अँटिऑक्सिडंट्स, शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात. कारलं खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण कारलं नेमकं कोणत्या पदार्थासोबत खावे. कोणत्या पदार्थासोबत खाऊ नये. याची माहिती असणं गरजेचं आहे(5 foods you must avoid with bitter gourd (Karela)).

यु. एस डिपार्टमेण्ट ऑफ अग्रिकल्चर या वेबसाईटनुसार, 'कारल्यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, फोलेट, व्हिटॅमिन ए असते. जे मधुमेह, बॅड कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात.'

कारलं खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?

दूध

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कारले किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर दूध पिऊ नये. यामुळे शरीराची मोठी हानी होते. कारलं खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

आपण खातो त्या मीठात आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक असल्याचा संशोधनाचा दावा, रोज पोटात जातेय प्लास्टिक..

आंबा

लोकांना आंबा खायला खूप आवडतो. कारल्याच्या भाजीबरोबर खात असाल तर थांबा. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मुळा

मुळा आणि कारले एकत्र खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. शिवाय पचनक्रियाही बिघडू शकते.

आपण खातो त्या मीठात आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक असल्याचा संशोधनाचा दावा, रोज पोटात जातेय प्लास्टिक..

दही

कारलं आणि दही शक्यतो एकत्र खाणं टाळावं. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. शरीरावर पुरळ तयार होऊ शकतात.

टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्स