Join us   

दिवसभर फ्रेश राहायचं, एनर्जी टिकवून ठेवायची तर न चुकता खायलाच हवेत ५ पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 6:25 PM

5 Foods you must include in your diet : आरोग्य आणि सौंदर्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी या डाएट टिप्स अतिशय महत्त्वाच्या ठरतात.

दिवसभर आपण घरातली कामं, ऑफीस, प्रवास, बाहेरची कामं अशा असंख्य गोष्टी करत असतो. हे सगळे करता करता आपण पूर्ण थकून जातो. पण हा थकवा येऊ नये आणि आपली एनर्जी लेव्हल चांगला राहावी यासाठी आपली जीवनशैली उत्तम असणे आवश्यक असते. आपला आहार, व्यायाम आणि झोप या गोष्टी नीट असतील तर आपल्याला दिवसभर कमी थकवा येतो. याबरोबरच ताणतणाव, उत्तम आरोग्य या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात (5 Foods you must include in your diet).

आपण दिवसभर शक्य तितका पौष्टीक आहार घ्यायचा प्रयत्न करत असतो.  पण दिवसभराच्या आहारामध्ये स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा आवर्जून समावेश केला तर आरोग्य आणखी चांगले राहण्यास मदत होते. आरोग्य आणि सौंदर्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी या डाएट टिप्स अतिशय महत्त्वाच्या ठरतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रमिता कौर अशाच काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. रोज न चुकता कोणत्या ५ गोष्टी आहारात घ्यायला हव्यात याविषयी त्या काय सांगतात पाहूया ...

१. सकाळी उठल्या उठल्या रात्रभर भिजवलेले ५ बदाम आणि २ आक्रोड खाल्ले तर दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास आणि नेहमीपेक्षा जास्त कार्यक्षम राहण्यास मदत होईल. 

२. रात्रभर पाण्यात भिजवलेले ५ ते ६ काळे मनुके अवश्य खायला हवेत. त्यामुळे पचनाशी निगडीत समस्या तर दूर होतातच पण त्वचाही छान ग्लोईंग होण्यास मदत होते. 

३. रात्री झोपताना ग्लासभर पाण्यात दालचिनी घालून ते पाणी उकळायचे आणि थोडे थंड झाल्यावर हे पाणी प्यायचे. त्यामुळे रात्री गाढ, शांत झोप लागण्यास मदत होते. 

४. अळीव आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. अळीवाची खीर, लाडू यासारखे पदार्थ आवर्जून खायला हवेत. दररोज १ चमचा अळीवाचा आहारात समावेश केल्यास केसही दाट, मजबूत आणि लांबसडक होण्यास मदत होते. 

५. जेवण झाल्यावर बडीशेप आणि ओवा यांचे पाणी प्यायल्यास पचनाशी निगडीत सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना