Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुधासोबत अजिबात आणि कधीच खाऊ नयेत ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, ते आरोग्यासाठी घातक, कारण...

दुधासोबत अजिबात आणि कधीच खाऊ नयेत ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, ते आरोग्यासाठी घातक, कारण...

5 Foods You Should Never Mix With Milk : आयुर्वेदात दुधाला बरेच महत्त्व असून ते योग्य पद्धतीने घेतल्यास शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 01:43 PM2022-12-16T13:43:47+5:302022-12-16T16:44:33+5:30

5 Foods You Should Never Mix With Milk : आयुर्वेदात दुधाला बरेच महत्त्व असून ते योग्य पद्धतीने घेतल्यास शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतात.

5 Foods You Should Never Mix With Milk : 5 things not to eat with milk at all; Experts say, dangerous for health, because... | दुधासोबत अजिबात आणि कधीच खाऊ नयेत ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, ते आरोग्यासाठी घातक, कारण...

दुधासोबत अजिबात आणि कधीच खाऊ नयेत ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, ते आरोग्यासाठी घातक, कारण...

Highlightsआहार घेताना तो योग्य पद्धतीने घेतला तरच त्याचे फायदे होतात काही पदार्थ एकमेकांसोबत खाणे आरोग्यासाठी चांगले असते, मात्र काही पदार्थ एकत्र केल्यास ते घातक ठरु शकतात

आपण घेत असलेला आहार आपल्या शरीराचे पोषण करण्यास उपयुक्त असतो. मात्र हा आहार चुकीच्या पद्धतीने घेतला गेला तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम व्हायला वेळ लागत नाही. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनीच शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम मिळावे यासाठी दूध आवर्जून प्यायला हवे असे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यानुसार आपण दिवसातून एकदा तरी दूध पितोच. पण दूध पिताना त्यासोबत काही पदार्थ अजिबात खाऊ नयेत (5 Foods You Should Never Mix With Milk).  

अन्यथा आरोग्यासाठी ते हानीकारक असते आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी सांगतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याविषयीची एक पोस्ट शेअर केली असून दुधासोबत कोणते पदार्थ घेणे टाळायला हवे याविषयी त्या माहिती देतात. आयुर्वेदात दुधाला बरेच महत्त्व असून ते योग्य पद्धतीने घेतल्यास शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतात. मात्र ते चुकीच्या पदार्थांसोबत घेतल्यास त्याचे तोटे होतात. पाहूयात दूध कोणत्या ५ पदार्थांसोबत अजिबात घेऊ नये.  

(Image : Google)
(Image : Google)

१. मीठ 

बरेचदा आपण कॉफीसोबत सॉल्टी बिस्कीट खातो, पण असे करणे योग्य नाही. कारण हे चुकीचे कॉम्बिनेशन आहे. 

२. मासे 

दूध आणि मासे हे चुकीचे क़ॉम्बिनेशन असून यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. तसेच यामुळे दाह होण्याचीही शक्यता असल्याने या दोन्ही गोष्टी अजिबात सोबत खाऊ नयेत.

३. गूळ 

दूध हे प्रकृतीने थंड असते आणि गूळ उष्ण असतो त्यामुळे विरुद्ध गुणधर्म असलेले हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. 

४. आंबट फळे 

आपण दूधात लिंबू पिळले तर दूध फाटते हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे आंबट फळांमध्ये दूध घालून ते घेतल्यास पोटात या दोन्हीची अॅसिडीत रिअॅक्शन होते. 

५. केळं 

आपल्याकडे केळ्याचं शिकरण करण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. मात्र हे चुकीचे कॉम्बिनेशन असून यामुळे पचनाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून केळं आणि दूध एकत्र करुन खाऊ नये. 
 

Web Title: 5 Foods You Should Never Mix With Milk : 5 things not to eat with milk at all; Experts say, dangerous for health, because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.