Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता

उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता

5 foods you should stay away from in summer आईस्क्रीम, बर्फाचे पाणी यासह हे ५ पदार्थ उन्हाळ्यात खाणे टाळा, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 02:11 PM2023-05-25T14:11:28+5:302023-05-25T14:15:58+5:30

5 foods you should stay away from in summer आईस्क्रीम, बर्फाचे पाणी यासह हे ५ पदार्थ उन्हाळ्यात खाणे टाळा, कारण..

5 foods you should stay away from in summer | उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता

उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता

प्रत्येक ऋतूनुसार आहारात देखील बदल होतो. उन्हाळ्यात थंड तर, हिवाळ्यात उष्ण पदार्थ खाल्ले जातात. सध्या उष्णता प्रचंड वाढली आहे. शरीराला थंडावा मिळावा, यासाठी लोकं हंगामी फळांचा आहारात समावेश करीत आहे. या फळांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण फळांशिवाय इतरही काही पदार्थ आहेत. ज्याचे सेवन लोकं मोठ्या प्रमाणावर करत आहेत. पण हे पदार्थ शरीराला थंडावा देण्याऐवजी उष्णता निर्माण करतात.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वारा लक्ष्मी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी असे काही पदार्थ सांगितले आहेत, जे दिसायला कुल दिसतात. आपल्या शरीराला थंडावा देतील असे वाटते. पण हे ५ पदार्थ शरीरात गेल्याने आरोग्याला हानी पोहचवतात. या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढू शकते(5 foods you should stay away from in summer).

बर्फाचे पाणी

उन्हाळ्यात बहुतांश लोकं थंड पाणी किंवा पाण्यात बर्फ घालून पितात. पण, थंड पाणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अनेकदा लोकं उन्हातून घरी आल्यानंतर पाण्यात बर्फ घालून पितात. परंतु आयुर्वेदात बर्फाचे पाणी थंड मानले जात नाही. बर्फाचे पाणी प्यायल्याने पोटात उष्णता वाढते. ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

दही

अनेकांना दही प्रचंड आवडते. उन्हाळ्यात हमखास आहारात दह्याचा समावेश होतो. दह्याचे अनेक पदार्थ केले जातात. दही खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहते. पण आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात प्रमाणाबाहेर दही खाणे टाळा. कारण उन्हाळ्यात दहीच्या सेवनामुळे पचनक्रिया मंदावते. यासह अपचन, पोट फुगणे, जडपणा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात.

आईसक्रीम

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोकं आईस्क्रीमचा आस्वाद घेतात. पण त्यात साखर आणि फॅट्स अधिक प्रमाणवर आढळते. जे पचायला खूप जड असते. त्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत पचनाची समस्या, आळस आणि जडपणाचा त्रास उद्भवू शकतो.

भयंकर उकाडा, रात्री झोपच लागत नाही? ७ उपाय- घाम कमी-झोपही लागेल शांत

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ते शरीरातील उष्णता वाढवतात. या ऋतूमध्ये लिंबाच्या अतिसेवनाने छातीत जळजळ, ऍसिडिटी किंवा त्वचेच्या समस्या यासारख्या समस्या निर्माण होतात.

उन्हाळ्यात डोळे लालेलाल झाले, सतत चुरचुरतात, आग होते, पाण्याच्या धारा? ६ सोपे उपाय, डोळे सांभाळा..

टोमॅटो

आयुर्वेदानुसार टोमॅटो शरीरात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे उन्हाळ्यात टोमॅटो खाणे टाळा. टोमॅटोची चव आंबट आणि किंचित आम्लयुक्त असते. उन्हाळ्यात टोमॅटोचे जास्त सेवन केल्यास अॅसिडिटी, त्वचेवर पुरळ उठणे किंवा जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Web Title: 5 foods you should stay away from in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.