लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातून अतिरिक्त चरबी घटवणे गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम गरजेचं आहे. यासह फळं खाणं देखील गरजेचं आहे. फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु, काही अशी देखील फळं आहेत, ज्यांच्या सेवनाने वजन कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढते. जर तुमच्या आहारात या फळांचा समावेश असेल तर, वेळीच या फळांना आपल्या आहारातून वगळा.
यासंदर्भात, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य आहारतज्ज्ञ डेलनाझ चंदुवाडिया यांनी, वजन कमी करत असताना कोणते फळे खाणे टाळावे याची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''फायबरयुक्त फळे पोट स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे भूक वाढते. भूक लागल्यावर उच्च कॅलरीजयुक्त फळे खाल्ल्याने वजन निरोगी आणि संतुलित पद्धतीने वाढण्यास मदत होते''(5 Fruits You Should Avoid If You Are Trying To Lose Weight).
केळी
केळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्यांचे वजन कमी आहे, किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे. त्यांनी आपल्या आहारात केळीचा समावेश करावा. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी आपल्या आहारातून केळी वगळायला हवी.
आंबा
फळांचा राजा आंबा प्रत्येकाच्या आवडीचा आहे. उन्हाळा ऋतूची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. पण चवीला भन्नाट असणारा हा आंबा आपले वजन वाढवू शकतो. एक कप आंब्याच्या तुकड्यांमध्ये ९९ कॅलरीज असतात. यात जास्त कर्बोदक आढळतात.
द्राक्ष
द्राक्षांमध्ये साखर आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढू शकते. 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 67 कॅलरीज आणि 16 ग्रॅम साखर असते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, द्राक्षे न खाणे उत्तम.
एवोकॅडो
एवोकॅडो हे एक हाय कॅलरी फळ आहे. असे म्हटले जाते की या फळामध्ये 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो हे निरोगी फॅट्सचा उत्तम स्रोत आहे. पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते. ते मर्यादित प्रमाणात खावे.
मनुका
मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. बेदाण्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. एक कप मनुक्यांमध्ये ५०० कॅलरीज असतात. त्यामुळे जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर, आहारात मनुक्यांचा समावेश करा, अथवा टाळावा.