वजन कमी करत असताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेक जण व्यायाम शाळेत अथवा योगभ्यास करून वजन कमी करतात. आहारात देखील बदल घडवून डाएट फॉलो करतात. मात्र. हे सगळे बदल करून देखील वजन कमी होईलच असे नाही. नकळतपणे आपल्याकडून असे काही चुका होतात, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या बदल्यात वाढू लागते.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डॉक्टर शिखा सिंग यांनी वेट लॉस करतानाचे ५ गोल्डन रुल्स शेअर केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''वेट लॉस जर्नीमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे वजन कमी होत नाही, किंवा वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. आपल्या जर वजन कमी करायचे असेल, तर हे ५ गोल्डन वेट लॉस रुल्स फॉलो करून पाहा.''
७ ते ८ तासांची झोप आवश्यक
शरीराला ७ ते ८ तासांची झोप आवश्यक. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं. कोर्टिसोलचं प्रमाण वाढल्यानं चेहरा, छाती आणि पोटाची चरबी झपाट्याने वाढते. झोपेची कमतरता हे कार्टीसोलच्या अत्यधिक स्रावाचं कारण आहे. त्यामुळे शरीर आळशी होतं, इतर कामे करण्यास आपण टाळाटाळ करतो.
रात्री फार घोरता? घरचेही नावं ठेवतात? २ घरगुती उपाय- घोरणं होईल कमी
दिवसभरात ४ लिटर पाणी प्या
वजन कमी करत असताना आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याचे नियमित सेवन केल्याने, चयापचयच म्हणजेच मेटाबॉलिज्म सुधारते. यासह शरीराची ऊर्जा पातळी देखील वाढण्यास मदत होते. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित केल्याने वजन सहज कमी होण्यास मदत होते.
दररोज वजन चेक करा
वजन कमी करत असताना, दररोज वेट चेक करा. आपल्या शरीरात होणारे बदल आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही. आहार आणि व्यायामाच्या फरकांमुळे वजनात चढ-उतार होतात. हे बदल माहित असणे गरजेचं आहे.
स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा
वजन कमी करत असताना स्ट्रेस बाधा आणू शकते. तणावामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढते. एस्ट्रोजेनमुळे शरीरात चरबीची पातळी वाढू लागते. ज्यामुळे व्यक्ती लठ्ठ होतो, स्ट्रेसमुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो.
वेट लॉस दरम्यान डिनर ७च्या आत करा
वजन कमी करत असताना काही लोकं डिनर स्किप करतात. दरम्यान, डिनर स्किप हा ऑप्शन चुकीचा आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवण ७ च्या आत करा. ८ वाजल्यानंतर कोणतेही पदार्थ खाऊ नका. आपण लिक्विड फॉर्ममधील पदार्थ सेवन करू शकता. यासह शरीरात प्रथिनांचे प्रमाण वाढवा.