Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Kidney failure: किडनीचे आजार दूर ठेवतात 5 सवयी; करा छोटे लाइफस्टाइल बदल, टाळा मोठे आजार

Kidney failure: किडनीचे आजार दूर ठेवतात 5 सवयी; करा छोटे लाइफस्टाइल बदल, टाळा मोठे आजार

Kidney failure: हृदयविकार, कॅन्सर हे आजार जसे वाढत आहेत, तसंच किडनी विकाराचंही प्रमाण वाढत आहे... आपल्याला असलेल्या काही चुकीच्या सवयीच किडनी विकाराचं मुख्य कारण आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 02:41 PM2022-02-14T14:41:05+5:302022-02-14T14:41:51+5:30

Kidney failure: हृदयविकार, कॅन्सर हे आजार जसे वाढत आहेत, तसंच किडनी विकाराचंही प्रमाण वाढत आहे... आपल्याला असलेल्या काही चुकीच्या सवयीच किडनी विकाराचं मुख्य कारण आहेत..

5 habits that can keep your kidney healthy, How to avoid kidney failure? | Kidney failure: किडनीचे आजार दूर ठेवतात 5 सवयी; करा छोटे लाइफस्टाइल बदल, टाळा मोठे आजार

Kidney failure: किडनीचे आजार दूर ठेवतात 5 सवयी; करा छोटे लाइफस्टाइल बदल, टाळा मोठे आजार

Highlightsकिडन्यांना निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे काही छोटे- मोठे बदल करायला आजपासूनच सुरुवात करा.

वयाचा आणि एखादा आजार जडण्याचा आता काही संबंध राहिलेला नाही. कमी वयातही मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब अशा अनेक समस्या जडत आहेत.. या सगळ्यासाठी कारणीभूत ठरणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल. कामाच्या किंवा स्पर्धेच्या मागे धावताना, वीकएण्ड एन्जॉय किंवा कामाचा हँगओव्हर या वेगवेगळ्या नावाखाली आपण स्वत:ला काही चुकीच्या सवयी (bad habits that can cause kidney failure) लावून घेत आहोत..

 

यातुनच मग अनेक आजार जडत आहेत.. सध्या किडनी विकाराचे प्रमाणही खूप वाढले असून किडन्यांना निरोगी ( How to keep your kidney healthy) ठेवायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे काही छोटे- मोठे बदल करायला आजपासूनच सुरुवात करा.

 

१. भरपूर पाणी पिणे..
किडनी त्रास उद्भवू द्यायचा नसेल, तर भरपूर पाणी प्यायला हवे. लिक्विड डाएट योग्य प्रमाणात घ्यायला हवे. कारण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. शरीरातील टॉक्झिन्स वाहून नेण्यासाठी पाण्याची गरज असते. शरीरात पाणी योग्य प्रमाणात नसेल तर किडनीच्या कामात अडथळे येतात आणि मग किडनी खराब होण्यास तसेच इतर आजारही यातून उद्भवतात. 

 

२. हे पदार्थ जास्त खा.. 
सफरचंदामध्ये असणारं पेक्टीन, गाजरात असणारं बीटा केरॅटिन, कांद्यामध्ये असणारं प्राेस्टाग्लॅण्डिन शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. रक्तदाब नियंत्रणात राहणे किडनीसाठी चांगलं असतं. त्यामुळे आहारात नियमितपणे कांदा, लसूण, गाजर, सफरचंद, कोबी हे पदार्थ घेतले पाहिजेत. तसेच ज्या पदार्थांमधून मॅग्नेशियम जास्त प्रमाणात मिळते, असे पदार्थही आहारात जास्तीतजास्त घ्यावेत. 

 

३. साखरेवर नियंत्रण
साखरेचा आणि किडनीचा काय संबंध असा प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. पण अतिगोड खाण्याने  मधुमेह होण्याची शक्यता वाढते आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना किडनी विकार होण्याचा धोका खूप  जास्त  असतो. त्यामुळे किडनीविकार टाळायचे असतील, तरी गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.. त्यामुळे रक्तातील ब्लड- शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील आणि किडनीविकाराचा धोका कमी होईल. 

 

४. मिठाचे प्रमाण कमी ठेवणे
जेवणात वरतून मीठ वाढून घेणे किंवा स्वयंपाकात खूप जास्त मीठ घालणे किडनीचे आरोग्य बिघडवून टाकणारे आहे. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण वाढू देऊ नका. काेणत्याही पदार्थावर अगदी वरण- भात खातानाही वरतून मीठ घेणे टाळा. यासाठीच जंकफूड आणि विशेषत: चायनीज पदार्थ खाण्यावर जरा नियंत्रण ठेवा. कारण चायनीज मसाल्यांमध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं. 

 

५. लघवी रोखून ठेवू नका
कामात अडथळा, कंटाळा किंवा सोय नसल्यामुळे अनेकजण लघवी खूप काळ रोखून ठेवतात. ही सवय किडनीसाठी खूप घातक आहे. त्यामुळे ठराविक अंतराने युरिन पास होईल याची काळजी घ्यावी. लघवी रोखून ठेवण्याची सवय सोडून द्यावी. 
 

Web Title: 5 habits that can keep your kidney healthy, How to avoid kidney failure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.