हाडं ही आपल्या शरीराचा अविभाज्य घटक असतात. हाडांच्या जोरावर आपले संपूर्ण शरीर उभे असते. मात्र या हाडांचे आरोग्य बिघडले तर आपले जगणे मुश्कील होऊन जाते. अनेकदा व्यायाम न केल्याने किंवा आहारातून योग्य ते पोषण न मिळाल्याने हाडांचे दुखणे मागे लागते. कधी आपली पाठ किंवा मणका खूप दुखतो तर कधी आपल्या हाता-पायाची हाडं ठणकतात. एकदा हाडं दुखायला लागली की आपल्याला काय करावे ते सुधरत नाही. मात्र हाडांचे पोषण व्हावे यासाठी आहार चांगला असणे अतिशय गरजेचे असते. हाडे कायम मजबूत राहावीत यासाठी आहारात कोणत्या गोष्टी घेऊ नयेत याविषयी माहिती असायला हवी. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात. हाडांच्या आरोग्यासाठी काय काय खायला हवे याविषयी (5 Harmful Food Items for Bone Health)...
१. सॉफ्ट ड्रींक्स
सॉफ्ट ड्रींक्समध्ये साखर आणि कॅफीनचे प्रमाण जास्त असते. तसेच यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह म्हणून फॉस्फरीक अॅसिडचा उपयोग केला असल्याने हाडांचे नुकसान होते.
२. अॅनिमल प्रोटीन
मांसाहार करण्याऱ्यांनी योग्य त्या प्रमाणातच तो करायला हवा. जास्त प्रमाणात अॅनिमल प्रोटीन घेतले तर मूत्रावाटे जास्त प्रमाणात कॅल्शियम बाहेर पडते ज्यामुळे हाडांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
३. चहा-कॉफी
चहा, कॉफी आणि चॉकलेटमध्ये असणाऱा कॅफीन हा पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी घातक असतो.
४. तंबाखू- सिगारेट
ही व्यसने आरोग्य़ासाठी ज्याप्रमाणे घातक असतात त्याचप्रमाणे हाडांसाठीही ही व्यसने घातक असतात. निकोटीनमुळे शरीरातील कॅल्शियम शोषले जाण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
५. मीठ -साखर
जास्त प्रमाणात साखर किंवा मीठ खाणे आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
याशिवाय, ज्या लोकांची चण लहान आहे आणि ज्यांच्या स्नायूंची ताकद कमी आहे अशांमध्ये शरीरात कॅल्शियम कमी प्रमाणात शोधून घेतला जातो. तसेच तुम्ही नियमितपणे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तरी शरीरात कॅल्शियम शोशून घेण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश कऱणे आणि हाडांसाठी घातक पदार्थ कमीत कमी घेणे अतिशय आवश्यक आहे.