Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुठभर चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पाहा खाण्याची योग्य पद्धत व फायदे

मुठभर चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पाहा खाण्याची योग्य पद्धत व फायदे

5 Health and Nutrition Benefits of Chickpeas and Peanuts : सकाळी खा चणे-शेंगदाणे, ३० दिवस फॉलो करून पाहा, वजन होईल कमी-हृदयही राहील निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 03:59 PM2023-09-22T15:59:19+5:302023-09-22T16:00:19+5:30

5 Health and Nutrition Benefits of Chickpeas and Peanuts : सकाळी खा चणे-शेंगदाणे, ३० दिवस फॉलो करून पाहा, वजन होईल कमी-हृदयही राहील निरोगी

5 Health and Nutrition Benefits of Chickpeas and Peanuts | मुठभर चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पाहा खाण्याची योग्य पद्धत व फायदे

मुठभर चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पाहा खाण्याची योग्य पद्धत व फायदे

चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. चणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते, यासह प्रोटीनचे एक उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. लोक याचे सेवन अनेक प्रकारे करतात. बहुतांश लोकं चणे भिजवून किंवा उकडून खातात. चण्यासोबत आपण शेंगदाणे देखील खाऊ शकता. शेंगदाण्यांमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ३० दिवस नियमित मुठभर चणे - शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.

पचन सुधारण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत चणे-शेंगदाणे खाऊन आपण हेल्दी राहू शकता. चणे-शेंगदाणे नक्की कोणत्या पद्धतीने खायला हवे? चणे-शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? यासंदर्भातली माहिती लखनौस्थित बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांनी दिली आहे(5 Health and Nutrition Benefits of Chickpeas and Peanuts).

चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

गरोदरपणात फायदेशीर

गरोदरपणात चणे-शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. चणे-शेंगदाणे खाल्ल्याने बाळाचा विकास उत्तम होतो. शेंगदाणे ओमेगा ६ फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे त्वचेला कोमलता आणि ओलावा मिळतो.

रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

पचनक्रिया सुधारते

चणे-शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला अनेक समस्यांपासून सुटका मिळते. विशेषत: बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामध्ये आढळणारे फायबर पचन प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

हाडं मजबूत होतात

चणे-शेंगदाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत आहे. जे हाडांची ताकद वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. ३० दिवस नियमित चणे-शेंगदाणे खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.

त्वचा चमकदार करते

चणे-शेंगदाणे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. यातील अँटी-ऑक्सिडंटमुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारखी वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ लागतात. सकाळी नाश्त्यामध्ये मुठभर भिजवलेले चणे-शेंगदाणे खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल

हृदय निरोगी ठेवते

हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी नियमित चणे-शेंगदाणे खा. आपण यासाठी भिजवलेले चणे-शेंगदाणे खाऊ शकता. शेंगदाण्यांमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आढळतात. कार्डिओप्रोटेक्टिव्ह हा एक असा गुणधर्म आहे, जो हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटीने कमी करतो.

Web Title: 5 Health and Nutrition Benefits of Chickpeas and Peanuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.