Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फक्त ५ नियम, वर्षभर नियमित पाळाल तर तब्येतही फिट, वजन कंट्रोलमध्ये आणि आजारांचा धोका कमी

फक्त ५ नियम, वर्षभर नियमित पाळाल तर तब्येतही फिट, वजन कंट्रोलमध्ये आणि आजारांचा धोका कमी

Health tips: नव्या वर्षात फिट ॲण्ड फाईन् रहायचं असेल, तर तब्येतीचे हे काही नियम (rules for fitness) पाळायलाच हवेत... हे काही नियम पाळा आणि येत्या वर्षात हेल्दी रहा, असा सल्ला काही आरोग्यतज्ज्ञ देत आहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 02:51 PM2022-01-07T14:51:14+5:302022-01-07T16:58:33+5:30

Health tips: नव्या वर्षात फिट ॲण्ड फाईन् रहायचं असेल, तर तब्येतीचे हे काही नियम (rules for fitness) पाळायलाच हवेत... हे काही नियम पाळा आणि येत्या वर्षात हेल्दी रहा, असा सल्ला काही आरोग्यतज्ज्ञ देत आहेत...

5 Health rules for new year, follow these basic rules of health and stay fit and fine | फक्त ५ नियम, वर्षभर नियमित पाळाल तर तब्येतही फिट, वजन कंट्रोलमध्ये आणि आजारांचा धोका कमी

फक्त ५ नियम, वर्षभर नियमित पाळाल तर तब्येतही फिट, वजन कंट्रोलमध्ये आणि आजारांचा धोका कमी

Highlightsएखादा अवघड संकल्प करायचा आणि तो आठ दिवसही पाळायचा नाही, यापेक्षा आरोग्याविषयीचे सोपे नियम करा आणि ते वर्षभर पाळा

वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकानेच काही ना काहीतरी ठरवलेलं असतं. अमूक एक नियम वर्षभर पाळू किंवा ही एक गोष्ट या वर्षात कायमची सोडून देऊ... असे हे नियम असतात. पण बऱ्याचदा काय होतं की आपण काहीतरी अवघड निश्चय करतो, ज्याचं पालन करणं आपल्याला खरोखरंच खूप कठीण होणार असतं. म्हणूनच फिटनेस किंवा डाएट, हेल्थ याबाबत काही ठरवत असाल, तर अशा अवघड गोष्टी ठरवण्यापेक्षा काही सोपे सोपे नियम पाळा. 

 

यामुळे होतं काय की पाळायला नियम सोपे असल्याने आपण वर्षभर ते कोणताही अडथळा न येता व्यवस्थित निभावून नेऊ शकतो. एखादा अवघड संकल्प करायचा आणि तो आठ दिवसही पाळायचा नाही, यापेक्षा आरोग्याविषयीचे सोपे नियम करा आणि ते वर्षभर पाळा, हे जास्त योग्य आहे ना... त्यामुळेच तर या काही गोष्टी या नव्या वर्षात जरूर करण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील.

 

१. मास्क आणि स्वच्छता... Use of mask
नव्या वर्षात आपण कोरोनामुक्त होऊन जाऊ.. असं काहीसं वाटायला लागलं होतं, तेवढ्यातच पुन्हा एकदा कोरोनाने आपला दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे या वर्षीही तो आपला सोबती असणारच आहे. त्यामुळे कोरोनापासून (corona omicron) स्वत:ला आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर मास्क पाळा.. बाहेरून आणलेल्या वस्तूंचे सॅनिटायझेशन, स्वत:ची आणि घराची स्वच्छता आणि अर्थातच सोशल डिस्टंसिंग यांची काळजी घ्यायला यावर्षीही विसरू नका.

 

२. ८ ते १० ग्लास पाणी दररोज...(8 to 10 glass of water)
हा एक नियम आपल्याला वारंवार सांगितला जातो आणि बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा तर आपल्याकडून हा नियम अत्यंत किरकोळीत काढला जातो. पण फिट राहण्यासाठी हा नियम पाळणे खूपच गरजेचे आहे. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात असणारे टॉक्सिन्स शरीराबाहेर काढण्यास मदत होते. कारण पाण्यासोबत ते सहज शरीरातून बाहेर पडतात. इथेच कोणताही आजार होण्याचा आपला धोका कित्येक पटींनी कमी होतो. त्यामुळे नव्या वर्षी हा नियम कराच. 

 

३. साखरेचा वापर कमी करत चला...(sugar intake)
भरपूर साखर खाणारी व्यक्ती एकदम साखर सोडूच शकत नाही. ज्याला दररोज एक कप चहामध्ये एक ते दिड चमचा साखर घेण्याची सवय आहे, अशी व्यक्ती एकदम बिनसारखेचा चहा पचवू शकत नाही. फारफार तर महिनाभर हा नियम पाळला जातो आणि त्यानंतर कधी साखर सुरू होते, हे आपले आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे नव्या वर्षात एकदम साखर सोडण्याचा निर्णय घेऊ नका. मात्र चहा, कॉफी, सरबत यांच्यातलं साखरेचं प्रमाण तसेच गोड पदार्थांचं सेवन या गोष्टी हळूहळू कमी करून टाका.

 

४. योग्य झोप आणि व्यायाम (sleep and exercise)
मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी सशक्त, निरोगी ठेवायच्या असतील, तर झोप आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आलाच पाहिजे. दररोज एक तास वर्कआऊट करायला वेळ नसेल तर २० ते २५ मिनिटात करता येतील, असे व्यायाम करा. दरराेज रात्री १०- १०: ३० वाजता झोपी जा. वेळेत झोप आणि योग्य व्यायाम केला तर मन, शरीर दोन्ही उत्साही राहतील.

 

५. आहाराकडे लक्ष...(proper diet)
ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आपलं वय, वजन, उंची, कामाचं स्वरूप, व्यायाम यानुसार आपला आहार कसा आणि किती असावा याविषयी एकदा डॉक्टरांशी, आहारतज्ज्ञांशी नक्कीच संपर्क साधा आणि तुमचा डाएट प्लॅन आखून घ्या. खूप हेवी डाएट नियम पाळत बसण्यापेक्षा जे सहजासहजी फॉलो करणं शक्य आहेत, असेच नियम डॉक्टरांकडून समजून घ्या. 

 

Web Title: 5 Health rules for new year, follow these basic rules of health and stay fit and fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.