Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूध पचत नाही- दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ५ गोष्टी; दूध पचेल सहज

दूध पचत नाही- दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ५ गोष्टी; दूध पचेल सहज

5 healthy foods to mix in Milk for strong bones : हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी फक्त दूध पिऊ नका; त्यात ५ पैकी १ पदार्थ नक्कीच घाला..कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 03:14 PM2024-11-22T15:14:18+5:302024-11-22T16:12:47+5:30

5 healthy foods to mix in Milk for strong bones : हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी फक्त दूध पिऊ नका; त्यात ५ पैकी १ पदार्थ नक्कीच घाला..कारण

5 healthy foods to mix in Milk for strong bones | दूध पचत नाही- दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ५ गोष्टी; दूध पचेल सहज

दूध पचत नाही- दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ५ गोष्टी; दूध पचेल सहज

दूध (Milk) प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात (Health Tips). दूध गायीचं असो किंवा म्हशीचे, दूध प्यायल्याने शरीराला पौष्टीक घटक मिळतात (Strong Bones). बरेच जण गायीचं दूध पिताना नाक मुरडतात. आजही कित्येक घरांमध्ये आई - वडील आपल्या मुलांना नाश्त्यासोबत दुधाचाही ग्लास देतात.  कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. पण अनेकांना दूध व दुधाचे पदार्थ आवडत नाहीत. किंवा पचत नाही.

योगगुरु बाबा रामदेव यांनी गायीचे दूध पिण्याचे ५ उपाय सांगितले आहे. जर दूध पचत नसेल तर, दुधात ५ गोष्टी मिसळून प्या. यामुळे दुधाच्या पौष्टीक्तेमध्ये वाढ होईल. यासह हाडं देखील मजबूत होतील. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी दुधात कोणते पदार्थ मिसळावे?(5 healthy foods to mix in Milk for strong bones).

हाडं होतील मजबूत

बाबा रामदेव म्हणतात, 'हाडांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. दूध व दूधयुक्त पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं पोलादी होतात. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियाचा त्रास आहे. त्यांनी दुधात हळद मिसळून प्यावे. यामुळे हाडांच्या आरोग्याला भरपूर फायदा होईल.

ना तांदूळ - ना रवा, तरीही इडल्या होतील स्पॉन्जी - कापसासारख्या हलक्या; १५ मिनिटांत इडली तयार

सर्दी - खोकल्यापासून आराम

हिवाळ्यात सर्दी - खोकल्याचा प्रचंड त्रास होतो. ज्यांची इम्युनिटी कमी असते. त्यांना याचा त्रास होतो. यासाठी आपण दुधासोबत च्यवनप्राश मिक्स करून खाऊ शकता. यामुळे घसादुखी आणि पोटदुखीपासूनही आराम मिळतो. यामुळे पोटाचेही विकार दूर राहतात.


बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर

जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, आपण गायीच्या दुधात हरडची पावडर घालून दूध पिऊ शकता. यासाठी हरड किसून किंवा त्याची पावडर कोमट दुधात घाला. रामदेव बाबा यांच्या मते, 'एका व्यक्तीने ग्लासभर दुधात २-३ ग्राम हरड पुरेसे आहे. यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.'

कफ काढून टाकण्यासाठी उपाय

थंडीत छातीत कफ जमा होण्याची समस्या सामान्य आहे. खोकल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावर मात करण्यासाठी गायीच्या दुधात मुलेठी पावडर घालून प्यावे. या उपायाने खूप फरक पडतो. कफचा त्रास दूर होतो.

थंडीत गुडघे-कंबरेचं दुखणं वाढलंय? 'या' घरगुती तेलानं मालिश करा, ठणठणीत राहतील हाडं

अॅसिडिटीचा त्रास होईल दूर

अनेकदा गायीचं दूध प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो. यासाठी गायीच्या कोमट दुधात बडीशेप घालून पिऊ शकता. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होईल. पित्ताचाही त्रास होत असेल तर, आपण दुधात बडीशेप घालून पिऊ शकता. 

Web Title: 5 healthy foods to mix in Milk for strong bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.