Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हात-पाय सुकडे फक्त पोटच सुटलंय? जमिनीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा, सपाट होईल पोट

हात-पाय सुकडे फक्त पोटच सुटलंय? जमिनीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा, सपाट होईल पोट

5 Home Exercises For a Flat Stomach : वजन वाढणं कॉमन असलं तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणं हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:56 AM2023-11-03T09:56:50+5:302023-11-03T10:10:34+5:30

5 Home Exercises For a Flat Stomach : वजन वाढणं कॉमन असलं तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणं हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते.

5 Home Exercises For a Flat Stomach : Best Flat Stomach Workouts You Can Do at Home | हात-पाय सुकडे फक्त पोटच सुटलंय? जमिनीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा, सपाट होईल पोट

हात-पाय सुकडे फक्त पोटच सुटलंय? जमिनीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा, सपाट होईल पोट

आजकाल ७ ते ८ तास सतत बसून काम केल्यामुळे पोट सुटतं किंवा वजन कमी होता होत नाही. (Health Tips) लोकांकडे जिम किंवा बाहेर पार्कमध्ये  फिरण्यासाठीही वेळ नसतो. (5 home exercises for a flat stomach) अशात पोट सुटल्यानंतर ते कमी करणं कठीण होतं. वजन वाढणं कॉमन असलं तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणं हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते. (Weight Loss Tips)

घरच्याघरी काही सोपे व्यायाम करून तुम्ही फॅट्सचे प्रमाण कमी करू शकता. या व्यायामांमुळे शरीराची चांगली स्ट्रेचिंगसुद्धा होईल. हे व्यायाम करण्यसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. बसल्या बसल्या सोपे व्यायाम करून बेली फॅट कमी करू शकता. (How to loss Belly Fat) यासाठी तुम्हाला जीम किंवा योगा सेशन्सना जाण्याची काही गरज नाही.

१) बटरफ्लाय पोज

हे योगासन करण्यासाठी करण्यासाठी सगळ्यात आधी पाय लांब करून बसा. त्यानंतर दोन्ही पायांना दुमडून तळवे एकमेकांना चिकटवा आणि दोन्ही हायांनी पंजे पकडून बसा नंतर गुडघे वर-खाली करा. 

२) साईड बेंड्स

हा व्यायाम तुम्ही बसून किंवा जमिनीवर उभं राहून करू शकता. साईट बेंड्स करण्यासाठी जमिनीवर  दोन्ही पाय उघडून बसा नंतर दोन्ही हात डोक्यावर घेऊन एकमेकांना जोडा. एकदा कंबर  शरीराच्या डाव्या बाजूला आणि नंतर उजव्या बाजूला न्या. जवळपास  २० ते ३० वेळा हा व्यायाम रिपिट करा. ३ सेट्स मध्ये  रोज हा व्यायाम केल्यानं तुम्हाला फरक जाणवेल. 

३) खुर्चीवर साईड बेंड्स

हा व्यायाम करताना खुर्चीवर बसून हात खालच्या दिशेने ठेवा. मग आपले हात सरळ खालच्या दिशेने न्या नंतर हात पुन्हा वर आणा. हात वर घेऊन परत उजव्या बाजूने हात न्या.  जवळपास १५ ते २० रिपिटेशन्समध्ये हा व्यायाम ३ ते ४ वेळा रोज करा. यामुळे साईट फॅट्स कमी होण्यास मदत होईल. 

कोणत्या वेळेत सुर्य प्रकाशात गेल्यानं जास्तीत जास्त व्हिटामीन-D मिळते? आजार टाळायचेत तर....

४) वज्रासन

पोटाचे फॅट कमी करण्यासाठी वज्रासन हा व्यायाम फार फायदेशीर ठरतो. वज्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर चटई घाला.  मॅटवर मांडी घालतो त्याप्रमाणे बसून नितंब पायांच्या टाचांवर ठेवा. नंतर हात आणि गुडघे एकमेकांसमोर करा पाठ सगळ असावी. काही वेळ दीर्घ श्वास घेत ही पोज होल्ड करून ठेवा. 

डोक्यावर पांढरे केसच जास्त चमकतात? झोपण्याआधी नाभीत हे तेल लावा-५ दिवसांत मिळवा काळे केस

५) पश्चिमोत्तासन

पश्चिमोत्तासन करण्यासाठी जमिनीवर पाय समोरच्या दिशेने ठेवा. नंतर पाठ वाकवा आणि हाताच्या पंजाने पायांच्या पंज्याला स्पर्श करा.  ही क्रिया करताना डोकं खालच्या बाजूने असावे. काहीवेळ असेच ठेवल्यानंतर पहिल्या मुद्रेत परत या. 

Web Title: 5 Home Exercises For a Flat Stomach : Best Flat Stomach Workouts You Can Do at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.