Join us   

तापामुळे तोंडाची चव गेली? ५ उपाय, भूक लागेल - चव येईल परत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 6:03 PM

Lost your sense of taste or smell? 5 tips for eating well : तापामुळे तोंडाला अनेकदा खराब चव येते. अशा स्थितीत खाल्लेल्या कोणत्याही पदार्थाची चव आपल्याला कळत नाही. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही टिप्स...

आपल्या जिभेला किंवा तोंडाला काहीवेळा चव लागत नाही. जिभेला व तोंडाला कोणत्याही प्रकारची चव लागत नसल्याचा वाईट अनुभव आपण सगळ्यांनी कधी ना कधी घेतलाच असेल. तोंडाला किंवा जिभेला चव नसल्याची अनेक कारणे असू शकतात. तोंडाची दुर्गंधी, दातांची योग्य स्वच्छता न करणे, तोंडातील संसर्ग किंवा काहीवेळा आपल्याला भरपूर ताप आल्यामुळे देखील आपल्या तोंडाची चव बिघडू शकते. या सर्व कारणांपैकी बहुतांशवेळा तापाने आजारी पडल्यामुळे आपल्या तोंडाला व जिभेला कोणत्याही प्रकारची चव लागत नाही. 

ताप असताना किंवा बरे झाल्यानंतरही काही लोक तोंडाची चव गमावून बसल्याचे अनेकदा दिसून येते. या काळात काहीही खाताना त्याची चव कळत नाही. तोंडाला चव नसल्यामुळे आपल्याला काहीच खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी आपण असंख्य उपाय करून पाहतो. तोंडाची चव परत पहिल्यासारखी करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा वापर करू शकतो(5 Home Remedies For Loss Of Taste And Smell Prevention).

तापामुळे जर आपल्या तोंडाची चव गेली असेल तर नेमके काय करावे ? 

१. ऍपल सायडर व्हिनेगर :- 

१ टेबलस्पून ऍपल सायडर व्हिनेगर

१ ग्लास कोमट पाणी

एक ग्लास कोमट पाण्यात एक टेबलस्पून ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा. ते चांगले मिसळा, हवे असल्यास त्यात थोडे मध घालून प्या. हे दिवसातून एकदा करणे आवश्यक आहे. असे केल्याने तोंडाची चव परत येते. 

शुगर असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर लिची खाऊ नये? हे खरे की खोटे?

२. बेकिंग सोडा :- 

१ टेबलस्पून बेकिंग सोडा

लिंबाचा रस (काही थेंब)

एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. दात घासण्यासाठी ही पेस्ट वापरा. हे दिवसातून एकदा करा. यामुळे दातांना येणारी घाणेरडी दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होते. 

३. कोमट पाणी आणि मीठ :- 

१ टेबलस्पून मीठ

१ ग्लास कोमट पाणी

जेवताना जीभ चावली - दाताखाली आली? चटकन करा ५ उपाय - आग होईल कमी...

एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ घाला. ते चांगले मिसळा आणि तोंडात ठेवून या पाण्याने गुळण्या करा. असे दररोज २ ते ३ वेळा करावे. यामुळे तोंडाला चव येण्यास मदत होईल. 

४. हळद आणि लिंबू :- 

१/२ टेबलस्पून हळद पावडर

लिंबाच्या रसाचे काही थेंब

अर्धा चमचा हळद पावडरमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे. ही घट्ट पेस्ट आपल्या जिभेवर आणि तोंडात लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. सुमारे २ आठवडे दिवसातून एकदा हे करा. असे केल्याने जिभेची व तोंडाची बिघडलेली चव परत येण्यास मदत होते. 

५. लिंबू आणि गरम पाणी :-

१ लिंबू

१ ग्लास कोमट पाणी

एका ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. हे द्रावण चांगले मिसळा आणि तोंड स्वच्छ धुण्यासाठी याचा वापर करावा. या पाण्याने आपण गुळण्या किंवा चूळ भरु शकता. किमान आठवडाभर दिवसातून एकदा हा उपाय केल्याने तोंडाची चव पार्ट येण्यास मदत होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य