उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांची आग होण्याची समस्या बहुतेकांना जाणवते. अनेकांना तळव्यांची जळजळ होण्याची समस्या केवळ उन्हाळ्यातच नाहीतर एरवीही जाणवते. उन्हाळ्यात किंवा एरवीही पायांच्या तळव्यांची आग होण्यामागे अनेक कारणं असतात.
Image: Google
शरीरातलं पाणी कमी होणे, खूप थकवा येणं, रात्री पायाकडील रक्तप्रवाहाचा वेग वाढणे, हार्मोनल इम्बॅलन्स, ॲलर्जी, मधुमेह या अनेक कारणांमुळे तळपायांची आग होते. झोपही मुश्कील करणारी ही आग घरगुती उपायांनी शमवता येते.
तळपायांची आग शमवण्यासाठी ..
Image: Google
1. बर्फाच्या पाण्यात् पाय ठेवल्यास तळपायाची आग शमते. बर्फ वेदनाशामक असतो. जळजळ आणि वेदना कमी करण्याची क्षमता बर्फामध्ये असते. हा उपाय करण्यासाठी पाण्यत बर्फाचे तुकडे घालावेत. अशा बर्फाच्या पाण्यात पाय ठेवून 15 मिनिटं बसावं. या उपायानं तळपायांची जळजळ लगेच शमते.
Image: Google
2. नीलगिरीच्या तेलानं तळपायांना मसाज केल्यास पायांना थंडावा जाणतो. नीलगिरीचं तेल थंड प्रकृतीचं असतं. नीलगिरीच्या तेलात शीत घटक असतात.या तेलातील दाह आणि सूजविरोधी गुणधर्मामुळे सूज कमी होते, वेदना कमी होतात. तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी नीलगिरीच्या तेलानं तळपायांना मसाज करावा आणि थोड्या वेळानं पाय गार पाण्यानं धुवावेत.
Image: Google
3. तळपायांची आग शमवण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरही प्रभावी ठरतं. ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये बुरशी आणि जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. पायांना संसर्ग झाला असल्यासही पायांची जळजळ होते. ॲपल सायडर व्हिनेगरमुळे पायांना झालेला संसर्ग दूर होतो. त्यामुळे होणारी जळजळ शमते. जळजळ शमवण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचा उपाय करताना थोडं पाणी गरम करावं. या गरम पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर घालून या पाण्यात पाय ठेवून थोड्या वेळ बसल्यास पायाला झालेला संसर्ग दूर होतो. त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी होते. ॲपल सायडरमुळे पायाकडील रक्तप्रवाहही सुधारतो.
Image: Google
4. पायाला दही लावल्यास तळपायाच्या जळजळीवर आराम मिळतो. दह्यामध्ये जिवाणुविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. तसेच दह्यात शीत गुणधर्म असल्यानं दह्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. पाय स्वच्छ धुवून पायाला हलक्या हातान्ं मसाज करत दही लावावं. अर्ध्या ते एक तासानं पाय थंड पाण्यानं स्वच्छ धुवावेत.
Image: Google
5. सैंधव मिठात जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. सैंधव मिठामुळे जळजळ कमी होते. रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे तळपाय जळजळत असतील तर थंडं पाणी घ्यावं. त्यात सैंधव मीठ घालावं. या पाण्यात पाय सोडून थोडा वेळ बसावं. या उपायानं तळपायांची जळजळ कमी होते.