उन्हाळ्यात जास्त तहान लागणे ही एक सामान्य बाब आहे. पण जर सतत तहान लागत असेल तर? हे नक्की डिहायड्रेशनचं संकेत आहे की आणखी काही? कारण ही चिन्हे मधुमेह आणि अॅनिमियासारख्या आजारांकडे निर्देश करतात. हे ऐकून तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पाणी पिऊनही तहान जर भागात नसेल तर, त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
सलग दोन आठवडे ही समस्या अशीच राहिल्यास, भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका नाकारता येत नाही. यासंदर्भात, कन्नौजमधील गवर्नमेंट मेडिकल कॉलेजचे एसोसिएट प्रोफेसर डॉ. कैलाश सोनी यांनी, वारंवार तहान लागण्यामागचे कारण व अशा स्थितीत काय करावे याची माहिती दिली आहे(5 illnesses that make you feel thirsty all the time).
या ५ कारणांमुळे लागते सतत तहान
कोरडे तोंड
ड्राय माऊथ ही एक जास्त तहान लागण्याचं प्रमुख कारण असू शकते. जेव्हा लाळ ग्रंथी पुरेशी लाळ तयार करत नाहीत, तेव्हा तोंड पुरेसे ओलसर होत नाही. ज्यामुळे तोंड, घसा, आणि जीभ कोरडी पडू लागते. अशा स्थितीत ओठांनाही तडे पडतात. त्यामुळे डॉक्टरांना दाखवा, व जास्त पाणी प्या.
एका माणसानं एक दिवशी किती मीठ खाणं योग्य? तुम्ही प्रमाणात खाताय की कमी-जास्त, मोजा चटकन
मधुमेह
जास्त तहान लागणे हे एक मधुमेहाचं कारण असू शकते. जेव्हा किडनीला तुमच्या रक्तातून अतिरिक्त साखर मिळते, तेव्हा ग्लुकोज लघवीद्वारे बाहेर पडू लागते. ज्यामुळे वारंवार लघवी लागते. जास्त लघवीमुळे शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे सतत तहान लागण्याची समस्या निर्माण होते.
अपचन
जास्त तहान लागल्याने पचनसंस्थेवरही परिणाम होतो. अनेक वेळा मसालेदार अन्न सहज पचत नाही. ते पचवण्यासाठी शरीराला पाण्याची जास्त गरज भासते. त्यामुळे वारंवार तहान लागते.
जास्त घाम येणे
जास्त घाम येणे हे देखील वारंवार तहान लागण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरात पाणी कमी होऊन जास्त तहान लागते.
गरोदरपणानंतर १० दिवसात १० किलो वजन कमी? गौहर खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, फोटो व्हायरल..
अशक्तपणा
वारंवार तहान लागणे हे एक अशक्तपणाचे लक्षण असू शकते. जेव्हा शरीर पुरेशा प्रमाणात लाल रक्तपेशी निर्माण करू शकत नाही. तेव्हा हळूहळू लाल रक्तपेशींची कमतरता भासू लागते. अशा स्थितीत अॅनिमिया होऊ शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्या.