फोडणीत जिरे टाकताच तडतडली तर, पदार्थाची रंगत आणखी वाढते. जिऱ्याशिवाय फोडणी अपुरी आहे. जिऱ्याचा वापर फक्त फोडणीत नाहीतर, नियमित जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. विशेष म्हणजे जिरे हे पारंपारिक औषध म्हणून फार पूर्वीपासून वापरले जात आहे.
जिऱ्यामध्ये अनेक फायदेशीर घटक आढळतात. यामध्ये लोह, पोटॅशियम, जस्त आणि कॅल्शियम यांचा समावेश असतो. ३ महिने दररोज ३ ग्रॅम जिरं खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? यासंदर्भात, मेडिकलन्यूजटुडे डॉट या वेबसाईटवर जिरे खाण्याची पद्धत व त्यातून शरीराला होणारे फायदे याची माहिती देण्यात आली आहे(5 Impressive Health Benefits Of Cumin).
वेट लॉस करण्यास मदत
वजन कमी करण्यास जिरे मदत करते. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, नियमित व्यायाम आणि आहारात जिऱ्याचा समावेश करा. आपण पाण्यात जिरे उकळवून उपाशी पोटी पिऊ शकता. किंवा दुपारच्या जेवणात दह्यात ३ ग्रॅम जिरे पावडर मिसळून खाऊ शकता. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी यासह कंबरेचा आकार देखील कमी होतो.
फक्त २१ दिवस करा ५ गोष्टी, वजन तर कमी होईलच दिसाल सुडौल आणि व्हाल झटपट फिट
कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते
जिरे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते. नियमित ३ महिने ३ ग्रॅम जिऱ्याचे सेवन केल्याने नसांमधील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. जर आपल्याला बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, ३ महिने आहारात जिऱ्याचा समावेश करा.
मधुमेहावर गुणकारी
टाइप २ मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी जिरे खूप गुणकारी ठरते. यासाठी आपण आहारात जिऱ्याच्या तेलाचा समावेश करू शकता. ३ महिने जिऱ्याचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखर, इन्शुलिन आणि हिमोग्लोबिन A1C पातळीमध्ये लक्षणीय सुधारणा होते.
अँटीऑक्सिडंटने समृद्ध
जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, एपिजेनिन आणि ल्युटोलिन आढळते. जे मुक्त रॅडिकल्सला निरोगी पेशींवर हल्ला करण्यापासून रोखतात. यामुळे शरीर उत्साही व दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. यासह त्वचा आतून निरोगी ठेवण्यास मदत होते.
न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा, ग्लुटेन फ्री डोसा - वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता
पचनसंस्था सुधारते
जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार छळत असेल तर, आहारात जिऱ्याचा समावेश करा. उपाशी पोटी जिरं खाल्ल्याने पाचक एंजाइम्स वाढतात. ज्यामुळे पचन प्रक्रियेत मदत होते. जिऱ्यामध्ये थायमॉल आणि आवश्यक तेल आढळते. जे लाळ ग्रंथीला उत्तेजित करतात, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते.
उपाशी पोटी जिऱ्याचे सेवन कसे करावे?
खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?
- जिरे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठून ते उपाशी पोटी खा, त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या.
- आपण जिरे भाजूनही खाऊ शकता. नियमित सकाळी उपाशी पोटी जिरे भाजून खा. व त्यानंतर कोमट पाणी प्या.