बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना सकस आहार घेण्यासाठी वेळ मिळत नाही. ज्यामुळे बरेच जण इन्स्टंट पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. पण हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. ज्यामुळे विविध आजार शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जाही मिळत नाही. मुख्य म्हणजे शरीराला प्रोटीन (Protein), कॅल्शियम, यासह मुख्य पोषक घटक मिळत नाही. उत्तम आरोग्यासाठी शरीराला प्रोटीनची गरज असते (Soya Chunks).
प्रोटीनमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. यासाठी आपण आपल्या आहारात सोया चंक्सचा समावेश करू शकता (Health Benefits of Soya Chunks). सोया चंक्स फक्त प्रोटीनचा पॉवर हाउस नसून यात इतरही मुख्य घटक असतात. सोया चंक्स खाण्याचे फायदे किती? यामुळे कोणते आजार दूर राहतात? पाहूयात(5 Incredible Soya Chunks Benefits & Its Nutritional Value).
सोया चंक्स कसे तयार करतात?
हेल्थ शॉट्स या वेबसाईटनुसार, सोया चंक्सचा वापर भाजी, पुलाव यासह इतर पदार्थ तयार करण्यासाठी होतो. सोयाबीनचे तेल काढल्यानंतर उरलेल्या कोरड्या उत्पादनापासून सोया चंक्स तयार करण्यात येते. त्याचा टेक्सचर रफ, खडबडीत आणि कोरडा असतो. परंतु, गरम पाण्यात किंवा ग्रेवीमध्ये मिक्स केल्यास त्याचा टेक्सचर सॉ़फ्ट आणि स्पंजी होतो.
गॅसेसचा त्रास फार, पोट सतत फुगते? १ सोपा उपाय, पोटाला मिळेल चटकन आराम
सोया चंक्समधील पोषक घटक
सोया चंक्स प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. त्यात खनिजे, कॅल्शियम, आयर्न, जस्त, जीवनसत्वे आणि सेलेनियमने असतात. एका स्टडीनुसार १०० ग्रॅम सोया चंक्समध्ये ३४५ कॅलरीजसह ५२ ग्रॅम प्रोटीन, ०.५ ग्रॅम फॅट्स, ३३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १३ ग्रॅम फायबर असते.
सोया चंक्स खाण्याचे इतर फायदे
प्रोटीनचा उत्तम स्त्रोत
सोया चंक्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, १०० ग्रॅम सोया चंक्समध्ये जवळपास ३६ ग्रॅम प्रोटीन असते. जर आपल्याला वाटत असेल आहारात प्रोटीनची कमतरता असेल तर, आपण आपल्या आहारात सोया चंक्सचा समावेश करू शकता.
कोलेस्टेरॉल लेव्हल होते कमी
आहारात सोया चंक्सचा समावेश केल्याने नसांमधून बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. द जनरल ऑफ न्युट्रीशनच्या प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 'सोया चंक्समधील प्रोटीन शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करते. २५ ग्रॅम सोया चंक्स खाल्ल्याने शरीरातील ३ ते ४ टक्के बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
वजन कमी करण्यास मदत
सोया चंक्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय यातील इतर घटक वजन कमी करण्यास मदत करते. मॉलिक्यूल जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सोया चंक्सच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त फॅट्स झपाट्याने वाढत नाही. ज्यामुळे वेट लॉस करण्यात मदत होते. सोया चंक्समध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते.
पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठतेवर घरगुती ५ उपाय, पोट होईल साफ-सकाळी एकदम ओके
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम
सोया चंक्स आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. त्यामुळे ज्यांना हृदय रोग आहे, त्यांना आपल्या आहारात सोया चंक्सचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सोया चंक्समध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे आपल्या शरीरातून बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात. निरोगी आरोग्य आणि हृदयासाठी आठवड्यातून एकदा सोया चंक्स नक्की खा.
कॅल्शियमचा उत्तम सोर्स
सोया चंक्समध्ये प्रोटीनशिवाय कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडांचे दुखणे दूर होते. शिवाय हाडांना बळकटी मिळते. यासह हाडं बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करतात.