Join us

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे ५ पदार्थ, हृदय ठेवा ठणठणीत-रक्ताभिसरणही सुधारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2024 18:03 IST

5 Incredibly Heart-Healthy Foods : रक्ताभिसरणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आहारात ५ पौष्टीक पदार्थांचा समावेश करा..

बॅड कोलेस्टेरॉल वाढणे हे धोकादायक मानले जाते (Bad Cholesterol). यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या संबंधित इतर आजार, स्ट्रोक यासारख्या जीवघेण्या समस्यांचा धोका वाढतो (Blood Circulation). कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असते. एचडीएल कोलेस्ट्रॉल ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हटले जाते (Heart Health). तर, एलडीएल कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातक ठरते. खराब कोलेस्टेरॉल नसांना ब्लॉक करण्याचं काम करतात. ज्यामुळे रक्त प्रवाह थांबू शकते.

जर बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण शरीरात वाढू नये असे वाटत असेल तर,  पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचा आहारात समावेश करा. कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२, फॉस्फरस आणि सेलेनियमयुक्त पदार्थ खा. बॅड कोलेस्टेरॉलची पातळी  नक्कीच कमी होईल(5 Incredibly Heart-Healthy Foods).

हिरव्या भाज्या

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी, दररोज हिरव्या भाज्यांचे सेवन करायला हवे. हे रक्त शुद्ध करण्यातही खूप मदत करतात. शिवाय हिरव्या पाले भाज्यातील पौष्टीक घटक ऋतू बदलांनुसार होणाऱ्या आजारांपासून रक्षण करते.

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स आले, तुमचं पोट तर बिघडलेलं नाही? पाहा पिंपल्स येण्याची ३ कारणं..

अक्रोड

अक्रोड खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. मुख्य म्हणजे एलडीएल आणि ट्रायग्लिसराईड यामुळे कमी होते.

चिया सीड्स

चिया सीड्स हे ओमेगा -3, फॅटी ऍसिडस्, फायबर व इतर निरोगी पोषक घटकांचा एक उत्तम स्रोत आहे. आहारात चिया सीड्सचा समावेश केल्याने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. इतकंच नाही तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.

गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

सोयाबीन

सोयाबिन हे अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय, त्यात उपस्थित आयसोफ्लाव्होन एचडीएल पातळी वाढवतात, व फायटोएस्ट्रोजेन्स एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करतात. त्यामुळे आहारात सोयाबीनचा समावेश अवश्य करा.

टॅग्स : हृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्य