Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मसाल्याच्या डब्यांतील फक्त ५ पदार्थ आणि कफ सिरप होईल घरच्याघरी रेडी, सर्दी - खोकल्यावर घरगुती रामबाण उपाय...

मसाल्याच्या डब्यांतील फक्त ५ पदार्थ आणि कफ सिरप होईल घरच्याघरी रेडी, सर्दी - खोकल्यावर घरगुती रामबाण उपाय...

Homemade Cough Syrup : 5 Natural Ingredients That You Can Use As a Homemade Cough Syrup : 5-Ingredient homemade cough syrup made in 10 minutes : नेहमीच्या मसाल्यांच्या पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आयुर्वेदिक कफ सिरप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 06:00 PM2024-09-30T18:00:47+5:302024-09-30T18:13:36+5:30

Homemade Cough Syrup : 5 Natural Ingredients That You Can Use As a Homemade Cough Syrup : 5-Ingredient homemade cough syrup made in 10 minutes : नेहमीच्या मसाल्यांच्या पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आयुर्वेदिक कफ सिरप...

5-Ingredient homemade cough syrup made in 10 minutes Homemade Cough Syrup 5 Natural Ingredients That You Can Use As a Homemade Cough Syrup | मसाल्याच्या डब्यांतील फक्त ५ पदार्थ आणि कफ सिरप होईल घरच्याघरी रेडी, सर्दी - खोकल्यावर घरगुती रामबाण उपाय...

मसाल्याच्या डब्यांतील फक्त ५ पदार्थ आणि कफ सिरप होईल घरच्याघरी रेडी, सर्दी - खोकल्यावर घरगुती रामबाण उपाय...

सर्दी, खोकला आणि त्यामुळे होणारा कफ या नेहमीच्या अगदी कॉमन समस्या आहेत. पावसाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं सर्दी, खोकला होतो. यासोबतच फक्त या दोनच ऋतूंमध्ये नाही तर वर्षाच्या बाराही महिन्यांत आपल्याला अनेकदा सर्दी, खोकला होतोच. सुरुवातीला सर्दी - खोकला झाल्यावर तो सामान्य वाटत असला तरी तो लवकर बरा होत नसेल तर मात्र आपण वैतागून जातो. सर्दी किंवा खोकल्याने बेजार असलेल्या व्यक्तीला सगळेच नकोसे होऊन जाते. कधी शिंका येतात तर कधी घसा खवखवल्याने काय करावे सुचत नाही. काहींचे सतत नाक वाहते तर काहींचा घट्ट झालेला कफ बाहेरच पडत नाही. अनेकांना अशात तापही येतो(5 Natural Ingredients That You Can Use As a Homemade Cough Syrup).

सर्दी - खोकला, कफने अधिकच बेजार झालो तर लगेच मेडिकल मधून एखादे कफ सिरप आणून पितो. या कफ सिरपमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स  असतात. असे केमिकल्सयुक्त कफ सिरप पिण्यापेक्षा आपण काही घरगुती उपाय देखील करु शकतो. अशावेळी नेमके काय करावे कळत नसेल आणि लवकर बरे व्हायचे असेल तर घरच्याघरी झटपट तयार होणारे कफ सिरप (Homemade Cough Syrup) तयार करु शकतो. हे कफ सिरप तयार करण्यासाठी घरात असणाऱ्या मसाल्यांच्या डब्यातील काही नेहमीचे जिन्नस वापरुन हे सिरप (Make Your Own Homemade Cough Syrup) पटकन तयार करता येते. सर्दी, खोकला, कफ घालवण्यासाठी घरच्या घरीच होममेड नॅचरल सिरप कसे तयार करायचे ते पाहूयात. nutribit.app या इंस्टाग्राम पेजवरुन या घरगुती सिरपची रेसिपी शेअर करण्यात आली आहे(5-Ingredient homemade cough syrup made in 10 minutes).

साहित्य - 

१. काळीमिरी - १० ते १२ काळीमिरी दाणे 
२. लवंग - ६ ते ७ लवंग काड्या 
३. सुंठ - २ इंचाचा आल्याचा तुकडा
४. जायफळ पूड - १/२ टेबलस्पून 
५. मध - १/२ कप 

नीना गुप्तांच्या लेकीला गरोदर असताना लोकांनी दिले रसगुल्ला खाण्याचे आणि दूध पिण्याचे सल्ले कारण...


योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

 कृती :- 

१. सगळ्यात आधी एका कढईत काळीमिरी, लवंग दोन्ही जिन्नस कोरडे भाजून घ्यावे. 
२. आता कोरडे भाजून घेतलेले हे जिन्नस थोडे गार झाल्यावर खलबत्त्यात घालून त्यात सुंठाचा छोटासा तुकडा, जायफळ पूड घालून घ्यावे. आता हे सगळे जिन्नस खलबत्त्यात कुटून त्याची थोडी जाडसर पूड तयार करून घ्यावी. 
३. आता एक काचेचा एअर टाईट कंटेनर घेऊन त्यात अर्धा कप मध ओतून घ्यावे. या मधात खलबत्त्यातील जाडसर तयार करुन घेतली पूड घालावी आणि चमच्याच्या मदतीने सगळे जिन्नस ढवळून एकजीव करुन घ्यावे. 

या घरगुती कप सिरपचा वापर कसा करावा ? 

१. हे घरगुती कफ सिरप तयार केल्यानंतर एका एअर टाईट कंटेनरमध्ये एक महिन्यासाठी चांगले स्टोअर करुन ठेवले जाऊ शकते. 
२. जेव्हा आपल्याला सर्दी खोकला किंवा घशाच्या  इतर काही समस्या होतील तेव्हा दिवसातून ३ वेळा हे कफ सिरप प्यायल्यास आपल्या आराम मिळेल.

हे घरगुती कफ सिरप पिण्याचे फायदे... 

१. लवंग आणि सुंठ या दोन्हींमध्ये ॲन्टीऑक्सिडंट्स आणि ॲन्टीइन्फ्लेमेटरी घटक फार मोठ्या प्रमाणावर असतात. जे घसादुखी, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात. 

२. जायफळ रोग प्रतिकारशक्ती वाढवून घसा खवखवण्यासारख्या अनेक आरोग्य समस्यांपासून आराम देऊ शकते.

३. आपल्या छातीत साचून राहिलेला कफ संतुलित करण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. कफ बाहेर टाकण्यासाठी सुद्धा सुंठ उपयुक्त असते. 

४. कोणत्याही प्रकारचा खोकला आणि सर्दीमध्ये काळीमिरी अतिशय उत्तम काम करते. 

५. कोरड्या खोकल्यावर मध खाणे हा रामबाण उपाय मानला जातो. मधामुळे घशातील खवखव कमी होते तसेच घशामधील संसर्गही दूर होतो.

Web Title: 5-Ingredient homemade cough syrup made in 10 minutes Homemade Cough Syrup 5 Natural Ingredients That You Can Use As a Homemade Cough Syrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.