Join us   

गॅसमुळे पोट डब्ब होतं? नीट जेवणंही जात नाही, ५ उपाय, पोट साफ होईल, गॅस पडेल बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:36 AM

5 Instant Home Remedies For Gastric Problem : कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे पोट फुगते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेट तर राहतेच पण फुगण्यापासून आराम मिळण्यासही मदत होते.

पोट फुगणं ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे छातीत, पोटात वेदना जाणवतात. पोट जास्त फुगल्यामुळे व्यवस्थित जेवणही जास्त नाही. कमी खाल्लं तरी पोट जास्त फुगल्यासारखं वाटतं. शरीरातील फ्लूइड रिटेंशनमुळे ब्लोटींगची समस्या उद्भवते. पोट फुगण्याच्या समस्येवर उपाय करण्याआधी त्याची कारणं माहित असणं गरजेचं आहे. (How can I immediately cure gas problem)

पचनाच्या समस्यांमुळे हा त्रास उद्भवतोय डाएटमुळे की हार्मोनल बदल याचं कारण समजून घेणं महत्वाचं आहे. पोट फुगण्याचा त्रास  दीर्घकाळ टिकून राहीला तर गंभीर समस्या उद्भवू शकतात. यावर काही घरगुती उपाय करून तुम्ही लवकरात लवकर सुटका मिळवू शकता. (5 Instant Home Remedies For Gastric Problem)

काहीही खाल्यानंतर चालायला जा

पोट फुगण्याचं कारण पोटात अतिरिक्त गॅस जमा होणं हे असू शकतं. जेव्हा आपलं शरीर कमी प्रमाणात हालचाल करते तेव्हा पचनतंत्र व्यवस्थित काम करत नाही. म्हणूनच जेवल्यानंतर काहीवेळ चालणं गरजेचं असतं. यामुळे मासंपेशी मजबूत होतात आणि गॅस, मल सहज बाहेर पडण्यास मदत होते.

अंगात रक्त कमी झालंय, अशक्तपणा जाणवतो? ५ पदार्थ खा, थकवा दूर होऊन चेहरा दिसेल फ्रेश

योगासन

ब्लोटींगचा त्रास असल्यास काही योगासनांच्या मदतीने तुम्ही यापासून आराम मिळवू शकता. बालासन, आनंद बालासन आणि स्क्वॅट्स यांसारखे व्यायाम पोटाच्या स्नायूंवर अशा प्रकारे परिणाम करतात की ते पोटातील अतिरिक्त वायू बाहेर टाकण्यास सक्षम असतात आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्त होतात.

जास्त आणि भराभर खाऊ नका

हळूहळू जेवल्यानंतर पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. पचनाच्या  समस्या उद्भवत नाहीत. पण जेव्हा तुम्ही वारंवार खातात किंवा जास्त खातात, तेव्हा पचनसंस्थेला जास्त काम करावे लागते आणि पचनक्रियेत समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोटात अतिरिक्त गॅस तयार होऊ लागतो.

कॅल्शियम कमी झालंय? ८ पदार्थ खा, ठणठणीत राहील तब्येत; कमी खर्चात मिळेल पोषण

कोमट पाणी प्या

कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे पोट फुगते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेट तर राहतेच पण फुगण्यापासून आराम मिळण्यासही मदत होते. जेवल्यानंतर थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्या, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अन्न खाल्ल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी प्यायल्याने गॅस तयार होण्याची आणि पोट फुगण्याची शक्यता कमी होते. सकाळी उठल्यानंतर २ ग्लास गरम पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स