Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सुचवतात १ सोपा उपाय, पोटदुखी लगेच थांबेल

मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सुचवतात १ सोपा उपाय, पोटदुखी लगेच थांबेल

5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids : पोटातील जंतांना वेळीच ओळखून वेळीच त्यांच्यापासून सुटका मिळवायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:50 AM2024-07-23T10:50:28+5:302024-07-24T10:22:56+5:30

5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids : पोटातील जंतांना वेळीच ओळखून वेळीच त्यांच्यापासून सुटका मिळवायला हवी.

5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids : Worms In Stomach Of Child Home Remedies | मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सुचवतात १ सोपा उपाय, पोटदुखी लगेच थांबेल

मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सुचवतात १ सोपा उपाय, पोटदुखी लगेच थांबेल

मुलांची इम्यूनिटी कमकुवत झाली असेल याचा अर्थ असा की मुलं त्यांच्या  तब्येतीची काळजी घेत नाहीत. दुषित पाणी, शिळे अन्न, फास्ट फूड खाल्ल्यामुळे अनेकदा लहान मुलांना पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.   पिनवॉर्म, व्हिपवॉर्म, टेपवॉर्म किंवा फ्लुक्स इत्यादी, या पोटातील जंतांना वेळीच ओळखून वेळीच त्यांच्यापासून सुटका मिळवायला हवी. होमिओपेथी डॉक्टर टिना यांनी सांगितले की पोटातं जंत, किंवा बॅक्टेरिया तयार झालेत ते कसं ओळखावं. (5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids)

मुलांच्या पोटात किडे आहेत की नाही ते कसं ओळखाल?

डॉक्टर सांगतात की, मुलांचा स्वभाव आधीपेक्षा जास्त चिडचिडा झाला असेल किंवा त्यांच्या चेहऱ्यावर छोटे-छोटे दाणे आले असतील किंवा रात्री झोपताना दात किटकिटत असतील तर त्यांना पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. शरीरात कुठेही खाज येऊ शकते आणि मुलं लवकर थकतात अशा स्थितीत तुम्ही समजून जा की पोटात किडे झाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या पोटात किडे असतील तर होम्योपेथीचे औषध उत्तम उपाय आहे. चिना २००. हे औषध मुलांना तुम्ही देऊ शकता. मात्र एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण पोटदुखीची इतर अनेक कारणं असू शकतात.

पोटात जंत झाल्याची लक्षणं काय

तोंडातून लाळ गळणं, 

झोपताना दात वाजणं, 

भूक न लागणं, 

वजन वेगाने कमी होणं, 

नेहमी थकवा-कमकुवतपणा जाणवणं.

पोटात जंत होण्याची कारणं काय

मुलांच्या  पोटात किडे होण्याची अनेक कारण असू शकतात. कारण  त्यांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही. काहीही उचलून मुलं खातात,  तर काही मुलं नखं तोंडात घालतात. अशा स्थितीत पोटात किडे येण्याची शक्यता असते. मुलांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता म्हणजेच कॅल्शियम, आयर्न आणि जिंकची कमतरता असल्यास मुलांच्या पोटात किडे होतात. हे टाळण्यासाठी रोजचा आहार चांगला घेणं  गरजेचं आहे. डॉक्टर टिना सांगतात की ६ महिन्यांपासून १५ वर्ष वयात चिना २०० हे औषध दिले जाते. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. मुलांच्या उंची वाढण्यात या औषधामुळे व्यत्यय  येत नाही.

Web Title: 5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids : Worms In Stomach Of Child Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.