ब्रेन डेव्हलपमेंटसाठी (Brain Development) आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी रडत रडत उठत असेल आणि तुम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही ते चिडचिड आणि जिद्द करत असेल तर काही गोष्टी पालकांनी लक्षात ठेवायला हव्यात. (Parenting Tips) जर मुलांच्या दिवसाची सुरूवात प्रेमाने केली तर त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि दिवसभर त्यांना एनर्जेटीक वाटेल. (Parenting 5 Morning Activities To Boost Child Brain Devlopment And For Full Day)
मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते ते फार महत्वाचे असते. ज्यामुळे मुलं दिवसभर आनंदी, हसत-खेळत राहतात. आर्शीवाद चाईल्ड एंड फॅमिली क्लिनिकचे डॉ. सुरजीत गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर सांगितले की सकाळची १० मिनिटं मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी महत्वाची असतात. या खास वेळेला अजून खास बनवणं जबाबदारी आई वडीलांची असते.
मुलांच्या दिवसाची सुरूवात कशी असावी?
जेव्हा कधी तुम्ही मुलांना सकाळी उठवाल तेव्हा त्यांच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका ज्यामुळे ते दिवसभर ताणाखाली राहतील, पॉझिटिव्ह गोष्टी सांगून मुलांना उठवा. ज्यामुळे त्यांचा मेंदू सकाळी सकाळी पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला राहील. मुलांना ते किती स्मार्ट आहेत याची जाणीव करून घ्या. मुलाना तुम्ही जितकं प्रेम द्याल तितकेच ते मनाने मजबूत बनतील. यासाठी सकाळी त्यांचे डोळे उघडतील तेव्हा त्यांना मिठी मारा, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेले राहतील.
सकाळी उठवताना मुलांना काहीतरी एक्साईटमेंट आणि एडवेंचरसारख्या गोष्टी सांगा. शाळेत आणि घरात मुलं काय काय चांगल्या गोष्टी करू शकतात ते सांगा. त्यामुळे मुलं दिवसभर उत्साही राहतील.सकाळी उठवताना त्यांना सांगा की मुलं तुमच्यासाठी किती खास आहेत आणि त्यांचं आनंदी असणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे.
कमजोर हाडांना पोलादी ताकद देतील ६ पदार्थ; कॅल्शियम, प्रोटीन भरपूर मिळेल-बळकट होतील हाडं
जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. इतकंच नाही तर मुलांचा स्वत:वरचा विश्वासही वाढेल आणि चॅलेंजेस टॅकल करता येतील. शाळेत जाताना मुलांच्या हातावर छोटा हार्ट काढा. जेणेकरून ते चिन्ह पाहून मुलांना स्पेशल वाटेल.