Join us   

ऐन तारुण्यात हाडं ठिसूळ होऊ नयेत म्हणून खा ५ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात हाडं मजबूत ठेवायची तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 2:44 PM

5 Natural Ways to Build Healthy Bones : हाडांच्या मजबुतीसाठी फक्त कॅल्शियम पुरेसं नाही, या ५ पदार्थांचा आहारात समावेश कराच..कारण..

आज जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन. दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा केला जातो. वाढत्या वयामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. हा एक हाडांचा आजार आहे.  पण सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे ऑस्टिओपोरोसिसची समस्या वाढत चालली आहे. अशावेळी हाडं कमकुवत होतात, व फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो. हा आजार टाळायचा असेल तर, जीवनशैलीत काही बदल करून हाडांना बळकट करायला हवे.

हैद्राबादस्थित यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार ऑर्थोपेडिक डॉक्टर सुनील डाचेपल्ली सांगतात, 'हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर हाडांना पुन्हा जोडण्यासाठी मायक्रो व मॅक्रो पोषक तत्वांचा समावेश असलेल्या न्यूट्रिशनची गरज असते. यासाठी आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने यासह इतर आवश्यक खनिजे असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे'(5 Natural Ways to Build Healthy Bones).

कॅल्शियम

हाडांना बळकट करण्यासाठी आहारात कॅल्शियम हवेच. कॅल्शियम नसल्यास बोन मिनरल डेंसिटी व  हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.  प्रौढ व्यक्तींनी दिवसातून १००० ते १२०० मिलीग्राम कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन करावे. यासाठी आहारात दूध, दही, चीज, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, सोया, बीन्स, बदामाचे दूध यासह इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

मधुमेह झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ५ मुख्य लक्षणे, वेळीच ओळखा, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी कॅल्शियम वापरण्यास आणि हाडांमध्ये खनिजे तयार करण्यास मदत करते. प्रौढ व्यक्तींनी नियमित ६०० आययू व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे हाडांना बळकटी मिळते.

प्रोटीन

प्रोटीन हाडांचे बिल्डिंग ब्लॉक असते. त्याची रचना सुमारे ३० % प्रोटीनपासून तयार होते. प्रथिने फ्रॅक्चरमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला कॅल्शियम जमा करण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करते. यासाठी आहारात दूध, चीज, दही, नट्स, सीड्स, शेंगा, सोया बिन्स यासह इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीसाठी मदत करते. ज्यामुळे फ्रॅक्चर बरे होण्यास मदत होते. यासाठी मोसंबी, किवी, बेरी, टोमॅटो, बटाटे आणि हिरव्या भाज्या यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करा.

अॅसिडिटी होईल म्हणून तळकट-मसालेदार पदार्थ खाणं टाळताय? करून पाहा ३ उपाय, खा बिनधास्त

आयर्न

आयर्नच्या कमतरतेमुळे फ्रॅक्चर लवकर बरे होत नाही. आयर्न फ्रॅक्चर झालेल्या जागेपर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. ज्यामुळे हाडं लवकर स्ट्राँग होतात. यासाठी ड्रायफ्रुट्स, हिरव्या पालेभाज्या, यासह इतर आयर्नयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न