Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

5 Non-dairy Foods High in Calcium-Check Out list : ऐन तारुण्यात हाडातून कडकड आवाज येत असेल तर, आजपासून कॅल्शियमयुक्त ४ पदार्थ खायला सुरुवात करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 02:00 PM2024-03-05T14:00:26+5:302024-03-05T16:54:57+5:30

5 Non-dairy Foods High in Calcium-Check Out list : ऐन तारुण्यात हाडातून कडकड आवाज येत असेल तर, आजपासून कॅल्शियमयुक्त ४ पदार्थ खायला सुरुवात करा..

5 Non-dairy Foods High in Calcium-Check Out list | रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

संपूर्ण शरीराचा भार हा हाडांवर टिकून असतो. हाडं मजबूत असेल तर, आपली हालचाल व्यवस्थित होते. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडांच्या निगडीत आजार यासह हाडांचे दुखणे वाढते. वाढत्या वयानुसार हाडं ठिसूळ होऊ नये म्हणून वेळीच आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा (Health Care). कॅल्शियमच्या (Calcium) कमतरतेमुळे फक्त हाडं ठिसूळ होत नसून, हार्ट, ब्रेन आणि इम्युनिटी सिस्टम, यासह इतर गंभीर आजारांना आपण निमंत्रण देतो.

कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून आपण दुधाचे पदार्थ खातो (Non-Dairy Foods). पण डेअरी प्रॉडक्ट्स व्यतिरिक्त इतर पदार्थांमध्येही कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते (Bone Health). जर आपल्याला दूध व दुधाचे पदार्थ आवडत नसेल तर, ४ प्रकारचे नॉन-डेअरी प्रॉडक्ट्स खा(5 Non-dairy Foods High in Calcium-Check Out list).

आवळा

आवळा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे हाडांना मजबुती मिळते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. आपण आवळ्याचा रस, कॅण्डी किंवा आवळ्याचा आहारात समावेश करू शकता.

लोह भरपूर असलेले ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढून ब्लड सर्क्युलेशन सुधारेल; इम्युनिटीही होईल मजबूत!

सोयाबीन

सोयााबीनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. अर्धा कप सोयाबीनमधून शरीराला १७५एमजी कॅल्शियम मिळते. शिवाय त्यात प्रोटीन, आयर्न, उच्च फायबर यासह त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोयाबीन फक्त हाडांसाठी नसून, वेट लॉस यासह इतर गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरते.

बदाम

बदमामध्ये इतर ड्रायफ्रुट्स पेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम व्यतिरिक्त, बदामामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ई सारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. ज्यामुळे हाडांना मजबुती मिळते. शिवाय मेमरी देखील शार्प होते.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, फायबर, आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स असतात. ज्यामुळे चिया सीड्स आहारपूर्ण मानले जाते. शिवाय त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरससह हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात. त्यामुळे तिशीनंतर आपण आपल्या आहारात चिया सीड्सचा समावेश करू शकता.

रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, झिंक आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. एक कप ब्रोकोलीमध्ये ८७ मिलीग्राम कॅल्शियम असते. जर आपण दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त कॅल्शियमचा चांगला आणि चवदार पर्याय शोधत असाल तर, ब्रोकोलीचे पदार्थ तयार करून खा. आपण ब्रोकोली सूप, भाजी किंवा त्याचा पराठा तयार करून खाऊ शकता.

Web Title: 5 Non-dairy Foods High in Calcium-Check Out list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.