प्रथिने (Protien-Rich Foods) आपल्या शरीराचा मुख्य घटक आहे (Health Tips). त्याशिवाय आपले काम एक सेकंदही चालू शकत नाही (Muscle Gain). आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात प्रथिने असतात (Fitness). तुमच्या हाडांमध्ये प्रथिने असतात, स्नायू प्रथिनांपासून बनतात, रक्त, त्वचा, एन्झाईम्स, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन्स देखील प्रोटीनपासून बनतात (Healthy Lifestyle). पेशींची दुरुस्ती, नवीन पेशींची निर्मिती आणि शरीराचा विकास यामध्ये प्रथिनांना अत्यंत महत्त्व आहे. अशा परिस्थितीत जर शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा.
अनेकांना वाटते प्रोटीन खूप महाग असते. पण असं अजिबात नाही. काही स्वस्तात मस्त; घरगुती पदार्थांमध्येही प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. जर शरीराला प्रोटीनची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर, स्वयंपाकघरातल्या ५ पदार्थ खा. वेट लॉस होईल आरोग्याला उर्जाही मिळेल(5 Quick And Easy To Cook High Protein Recipes).
५ शक्तिशाली प्रोटीनयुक्त पदार्थ
बिन्स असलेल्या भाज्या
दररोज बिन्स असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. हार्वर्ड मेडिकल हेल्थनुसार, बीन्स असलेल्या भाज्यांमध्ये प्रोटीनचा खजिना दडलेला आहे. एक कप बिन्स असलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला १५ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. इतकेच नाही तर बीन्समध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, फोलेट, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज यांसारख्या घटकांचा समावेश असतो. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यासह ब्लड शुगरची पातळीही नियंत्रणात राहते.
दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..
नट्स
बदाम, हेझलनट्स, अक्रोड, शेंगदाणे, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया, फुलाच्या बिया, पीनट बटर इत्यादी प्रथिनांचे पॉवरहाऊस आहेत. प्रथिनांसह त्यात हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळते. या गोष्टींमध्ये कॅलरीज पण असते. ज्यामुळे शरीराला झटपट ताकद मिळते. या गोष्टी पाण्यात भिजत घालून खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
क्विनोआ
क्विनोआ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यासह यात फायबर, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. क्विनोआ खाल्ल्याने शरीराला ८ ग्रॅम प्रोटीन मिळते. तर, ५ ग्रॅम फायबर मिळते.
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
ओट्स
वेट लॉससाठी बरेच जण ओट्स खातात. अर्धा कप ओट्समध्ये ५ ग्रॅम प्रोटीन असते. तर ४ ग्रॅम फायबर असते. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, ओट्स अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहे. आपण ओट्सचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता.