Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भरपूर वर्षे जगणाऱ्या, फिट आणि सुंदर दिसणाऱ्या जपानी माणसांचं ‘डाएट सिक्रेट’!- आपल्यालाही सहज जमेल

भरपूर वर्षे जगणाऱ्या, फिट आणि सुंदर दिसणाऱ्या जपानी माणसांचं ‘डाएट सिक्रेट’!- आपल्यालाही सहज जमेल

5 Reasons Why Japanese Are So Fit : आपल्यालाही त्यांच्यासारखे दिर्घायुष्य आणि सुंदर त्वचा मिळू शकते. पाहूयात हे ५ गोल्डन रुल्स ऑफ लाईफ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2023 09:41 AM2023-05-06T09:41:14+5:302023-05-06T09:45:01+5:30

5 Reasons Why Japanese Are So Fit : आपल्यालाही त्यांच्यासारखे दिर्घायुष्य आणि सुंदर त्वचा मिळू शकते. पाहूयात हे ५ गोल्डन रुल्स ऑफ लाईफ..

5 Reasons Why Japanese Are So Fit : The 'diet secret' of Japanese men who live for many years, fit and look good! | भरपूर वर्षे जगणाऱ्या, फिट आणि सुंदर दिसणाऱ्या जपानी माणसांचं ‘डाएट सिक्रेट’!- आपल्यालाही सहज जमेल

भरपूर वर्षे जगणाऱ्या, फिट आणि सुंदर दिसणाऱ्या जपानी माणसांचं ‘डाएट सिक्रेट’!- आपल्यालाही सहज जमेल

जपानी लोकं नेहमीच तरुण दिसतात, ते भरपूर वर्ष जगतात आणि त्यांना होणाऱ्या आजारांचे प्रमाणही कमी आहे असे आपण नेहमी ऐकतो. वर्कहोलिक असणाऱ्या जपानी लोकांची त्वचाही अतिशय नितळ आणि सुंदर असते. आता असे सगळे का? जपानी लोकांचे आरोग्य आणि सौंदर्य चांगले असण्यामागे नेमके काय कारण आहे असा प्रश्न आपल्याला काही वेळा पडतो. तर त्यांच्या आहाराच्या पद्धती आणि त्यांची जीवनशैली अतिशय उत्तम असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. भारतीयांनी त्यांच्याकडून आरोग्याबाबतच्या या गोष्टी नक्कीच शिकून घ्यायची आणि त्याचा अवलंब करायची गरज असल्याचे आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांचे म्हणणे आहे. जपानी लोक आहारात नेमकं काय घेतात, किती प्रमाणात घेतात आणि आरोग्यासाठी ते कसे चांगले असते यासाठीच्या ५ टिप्स श्वेता यांनी नुकत्याच शेअर केल्या आहेत. आपणही आपल्या रुटीनमध्ये या गोष्टींचा समावेश केल्यास आपल्यालाही त्यांच्यासारखे दिर्घायुष्य आणि सुंदर त्वचा मिळू शकते. पाहूयात हे ५ गोल्डन रुल्स ऑफ लाईफ (5 Reasons Why Japanese Are So Fit)...

१. जपानी लोकं किती खातात यावर त्यांची तब्येत अवलंबून असते. आपण पोळीसाठी किंवा नाश्ता करायला जी प्लेट वापरतो ती प्लेट हे लोक मुख्य जेवणासाठी वापरतात. म्हणजेच ते एकावेळी अनावश्यक जास्त न खाता गरज आहे तेवढेच खातात.

२. गव्हापेक्षा ते आहारात तांदळाचा जास्त प्रमाणात वापर करतात. भात खाल्ल्याने कार्डिओव्हॅसक्युलर डिसिज म्हणजेच हृदयरोगाची समस्या उद्भवण्याचे प्रमाण कमी असते. तर गव्हाच्या पीठामुळे या समस्या वाढण्याची शक्यता असते. 


३. जपानी लोकांच्या आहारात आंबवलेल्या पदार्थांचा समावेश जास्त असतो, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

४. त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये धार्मिक गोष्टींना बरेच महत्त्व आहे ज्यामध्ये शारीरिक हालचालींवर भर आहे. त्यामुळे नकळत त्यांच्या शरीराच्या हालचाली होतात आणि जपानी लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

५. प्रिव्हेंटीव्ह केअरला जपानी लोकं विशेष महत्त्व देतात. मे़डीटेशन, मार्शल आर्टस आणि शांत होण्यासाठीचे काही टेक्निक्स हे त्यांच्या संस्कृतीशी निगडीत असल्याने त्यांचे शरीर, मन आणि आत्मा हे तिन्ही शांत राहण्यास फायदा होतो. 

Web Title: 5 Reasons Why Japanese Are So Fit : The 'diet secret' of Japanese men who live for many years, fit and look good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.