Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किडनी स्टोनची ५ सामान्य लक्षणं, युरीनच्या रंगाकडे लक्ष द्या आणि वेळीच समस्या ओळखा...

किडनी स्टोनची ५ सामान्य लक्षणं, युरीनच्या रंगाकडे लक्ष द्या आणि वेळीच समस्या ओळखा...

5 Signs In Urine that indicates the kidney Stone : स्टोन झालाय हे वेळीच लक्षात यावे यासाठी आपल्या युरीनकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 04:07 PM2023-11-20T16:07:51+5:302023-11-20T16:12:18+5:30

5 Signs In Urine that indicates the kidney Stone : स्टोन झालाय हे वेळीच लक्षात यावे यासाठी आपल्या युरीनकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

5 Signs In Urine that indicates the kidney Stone : 5 common symptoms of kidney stones, pay attention to the color of urine and identify the problem in time... | किडनी स्टोनची ५ सामान्य लक्षणं, युरीनच्या रंगाकडे लक्ष द्या आणि वेळीच समस्या ओळखा...

किडनी स्टोनची ५ सामान्य लक्षणं, युरीनच्या रंगाकडे लक्ष द्या आणि वेळीच समस्या ओळखा...

किडनी स्टोन ही सध्या अतिशय सामान्य समस्या झालेली आहे. एकाएकी कंबरेत नाहीतर ओटीपोटात कळा येणे आणि डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला स्टोन असल्याचे समजणे हे आता अगदीच नेहमीचे झाल्यासारखे वाटते. शरीरात स्टोन तयार होत असताना आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. मात्र एकाएकी हे दुखणे इतके वाढते की वेदना असह्य होतात. अनेकदा किडनी स्टोन जास्त प्रमाणात वाढल्यास शस्त्रक्रिया करुन तो काढण्याची वेळ येते. आता किडनीमध्ये हे खडे किंवा स्टोन कसे तयार होतात असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. तर युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक ॲसिड आणि ऑक्झालेट या घटकांचं प्रमाण वाढतं आणि ते एकत्र येऊ लागतात, तेव्हा युरिन ट्रॅकमध्ये आणि किडनीमध्येही त्याच्या गाठी तयार होतात. त्यालाच आपण किडनी स्टोन किंवा मग मुतखडा म्हणून ओळखतो (5 Signs In Urine that indicates the kidney Stone). 

शरीरातील अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी अतिशय महत्त्वाचे काम करत असते. मात्र किडनीला काही व्याधी झाली तर शरीरातील रक्तशुद्धीच्या कार्यात अडथळे येतात. म्हणून वेळीच आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास हा त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते. किडनी स्टोन झालाय हे वेळीच लक्षात यावे यासाठी आपल्या युरीनकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. कारण युरीनशी निगडीत काही लक्षणे ही स्टोनशी निगडीत असल्याने वेळीच लक्षात आले तर त्यावर उपाय करता येणे शक्य असते. आता ही लक्षणे कोणती ते समजून घेऊया...

(Image : Google)
(Image : Google)

१. लघवी करताना आग होणे

काहीवेळा कोणाला कसे सांगायचे यामुळे अनेक जण लघवीला होत असलेल्या आगीकडे दुर्लक्ष करतात. किंवा हे दुखणे अंगावर काढतात, मात्र असे करुन उपयोग नाही. तर लघवी करताना आग होत असेल तर वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत म्हणजे भविष्यातील किडनीच्या समस्या वेळीच दूर होण्यास मदत होईल. 

२. लघवीला वास येणे

अनेकदा आपल्या लघवीला एकप्रकारचा उग्र वास येत असतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लघवीमध्ये काही केमिकल्सची निर्मिती झाल्याने अशाप्रकारचा वास येण्याची शक्यता असते. असे होणे आरोग्यासाठी चांगले नसल्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष द्यायला हवे.

३. लघवी करताना वेदना होणे

काही जणांना लघवी करताना वेदना होतात पण हे चारचौघात सांगणार कसे या भितीखातर लपवले जाते. पण किडनी स्टोन असेल तर अशाप्रकारच्या वेदना होऊ शकतात. त्यामुळे हे लक्षण वेळीच लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करायला हव्यात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. सतत लघवी लागणे

किडनीमध्ये स्टोन असेल तर वारंवार लघवी लागण्याची समस्याही भेडसावते. एकदा लघवी झाली तरी लगेचच लघवी लागल्यासारखे वाटत राहते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ब्लॅडर एकावेळी पूर्णपणे रिकामे होत नाही. तुम्हालाही असे जाणवत असल्यास स्टोन असल्याचा महत्त्वाचा संकेत आहे हे लक्षात घ्यायला हवे. 

५. युरीनचा रंग बदलणे

युरीन ही स्वच्छ, पारदर्शक असावी असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. किडनीमध्ये पाणी योग्य पद्धतीने फिल्टर न झाल्याने युरीनचा रंग पिवळा किंवा थोडा गडद होतो. अशावेळी किडनीशी निगडीत काही समस्या आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.   

Web Title: 5 Signs In Urine that indicates the kidney Stone : 5 common symptoms of kidney stones, pay attention to the color of urine and identify the problem in time...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.