हार्मोन्स आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शरीरातील विविध क्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी हे हॉर्मोन्स महत्त्वाचे असतात. मात्र या हार्मोन्सच्या पातळीत काही कमी जास्त झालं तर त्याचे शरीरावर विपरीत परीणाम होतात. स्त्रियांमध्ये या हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे पाळीशी निगडीत किंवा इतर काही समस्या उद्भवतात. आता आपल्या शरीरातील हार्मोन्सची पातळी वर-खाली झाली हे कसं ओळखायचं? तसंच कोणत्या ५ हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो आणि तो झाल्यास उपाय म्हणून काय करायला हवं याविषयी आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा काही महत्त्वाच्या टिप्स देतात (5 Signs of Hormonal Imbalance).
हार्मोन्सचे असंतुल झालंय हे कसं ओळखाल?
१. अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीत प्रमाणापेक्षा कमी रक्तस्त्राव होणे
२. सतत मूड स्विंज होणे किंवा निराशाजनक वाटणे
३. अचानक वजन खूप वाढणे किंवा खूप कमी होणे
४. वंध्यत्व किंवा मूल होण्यात अडचणी निर्माण होणे
५. केस गळणे किंवा केस प्रमाणापेक्षा खूप पातळ होणे
हार्मोन्सची पातळी कमी झाल्यावर उद्भवणाऱ्या समस्या
१. PCOS पॉलिसिस्टीक ओव्हरीयन सिंड्रोम
२. हायपोथायरॉइडिझम
३. हायपरथायरॉइडिझम
कोणत्या ५ हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होतात?
१. इस्ट्रोजेन
२. प्रोजेस्टेरॉन
३. टेस्टोस्टेरोन
४. कॉर्टीसोल
५. थायरॉईड हार्मोन्स
कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्याल?
१. आहार आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास हार्मोन्सच्या या समस्या नियंत्रणात आणता येतात.
२. हार्मोन्सची पातळी वर-खाली झाली आहे हे तपासण्यासाठी विशिष्ट हार्मोन्सच्या ब्लड टेस्ट कराव्या लागतात.
३. वरील लक्षणे दिसल्यास तज्ज्ञ हार्मोन्सच्या चाचण्या करायचा सल्ला देतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच या चाचण्या करुन घ्यायला हव्या.